बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिचे हिऱ्याचे कानातले मुंबई विमानतळावर हरवले असून तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. तसेच, कानातले शोधणाऱ्याला बक्षीस देईन असंही जुही चावलाने म्हटलंय.

जुहीने ट्विटरद्वारे कानातले हरवल्याची माहिती शेअर केलीये. “सकाळी (रविवारी) मी मुंबई एअरपोर्टच्या गेट नंबर 8 मधून जात होती. Emirates Counter वर मी चेक-इन केलं, सिक्युरिटी चेकिंग झाली, पण यादरम्यान माझे हिऱ्याचे कानातले कुठेतरी पडले. कोणी माझी मदत केली तर मला खरंच खूप आनंद होईल. मी गेल्या १५ वर्षांपासून हे कानातले सतत घालत आहे…कृपया ते शोधण्यामध्ये माझी मदत करा… कानालते सापडले तर कृपया पोलिसांना माहिती द्या…मी तुम्हाला बक्षीस देईन”, असं जुही चावलाने म्हटलं आहे.


या ट्विटसोबतच जुहीने कानातल्यांचा एक फोटोही शेअर केला आहे. आता जुहीने शेअर केलेल्या कानातल्यांचा फोटो आणि तिचं ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे.