News Flash

‘हा नवा अभिनेता कोण?’; त्या ट्विटनंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न; कंगणा झाली ट्रोल

चार तासात २० हजारहून अधिक ट्विट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वीच अंमली पदार्थांचा संदर्भ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्यासंदर्भातील चर्चा यामुळे पुन्हा नव्याने रंगू लागल्या. त्यातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगणा रणौतने बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट असल्याचा दावा केला. त्यानंतर आज तिने थेट रणवीर सिंह, रणबीर कपूरसहीत काही अभिनेत्यांच्या रक्ताची चाचणी करण्याची मागणी केली आहे. मात्र तिने ही मागणी करताना केलेल्या ट्विटमधील एका चूकीमुळे ती ट्रोल होताना दिसत आहे.

“रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशिक या अभिनेत्यांंनी अंमली पदार्थाच्या तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमूने द्यावे. या अभिनेत्यांना कोकेनचं व्यसन आहे अशी अफवा सध्या पसरली आहे. या अफवा त्यांनी खोट्या ठरवाव्यात अशी माझी इच्छा आहे. जर त्यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या तर हेच कलाकार इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरु शकतील,” असं ट्विट कंगनाने केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील टॅग केलं आहे.

हे ट्विट चांगलचं व्हायरल झालं आहे. चार तासांमध्ये १६ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. मात्र काहींनी या ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या एका नावावर आक्षेप घेतला आहे. विकी कौशिक असा कोणता अभिनेताच बॉलिवूडमध्ये नसल्याचे अनेकांनी ट्विटवर म्हटलं आहे. ‘उरी’ आणि ‘राजी’ या चित्रपटातील अभिनयामुळे घरोघरी पोहचलेल्या अभिनेत्याचे नाव विकी कौशल असं आहे. मग हा विकी कौशिक कोण आहे असा प्रश्न अनेकांनी कंगणाला विचारला आहे. यावरुन अनेकांनी कंगणाला ट्रोलही केलं आहे. विकीच्या एका चाहत्याने तर कंगणाला रनआऊट म्हटलं तर चालेल का असा प्रश्नही विचारला आहे.

१) असं प्लॅन केलं होतं?

२) कोण नातेवाईक आहे का?

३) न्याय हवा

४) कोण आहे हा?

५) तो नेपाळी आहे

६) असं काय आहे त्याच्याकडे…

७) तो लहान भाऊ आहे त्याचा

८) तुला रनआऊट म्हटलं तर चालेल का?

९) कोणाला काही ठाऊक आहे का?

१०) तो एवढा नवीन आहे की

११) अस्तित्वात नसलेल्यांबद्दल बोलते

१२) तिला नाव पण ठाऊक नाही आणि…

कंगणाने नावामध्ये चूक केल्यानंतर Vicky Kaushik हा शब्द ट्विटर इंडियावर टॉप ट्रेण्ड आहे. चार तासांमध्ये Vicky Kaushik बद्दल २० हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 5:27 pm

Web Title: kangana ranaut wrote vicky kaushik instead of vicky kaushal got troll scsg 91
Next Stories
1 SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; ATM मधील फसवणूक रोखण्यासाठी सुरु झाली नवी सेवा
2 Viral Video: नामकरण विधीनंतर हत्तीच्या पिल्लाने केली धम्माल, काँग्रेसचे खासदारही म्हणाले So Cute…
3 “धर्म के ठेकेदार बने फिरते हैं…”; मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल यांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X