बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थांचा संदर्भ पुढे आल्यानंतर अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती बुधवारी २८ दिवसांनी तरुंगाबाहेर आली. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला बुधवारी जामीन मंजूर केला. रियाला ८ सप्टेंबर रोजी अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली होती. दरम्यान रियाची सुटका झाल्यानंतर ट्विटरवर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग नंबर एकला ट्रेण्ड होताना दिसला. सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन असं अभिनेत्री कंगना रणौत जुलै महिन्यामध्ये म्हणाली होती. दरम्यान नुकताच एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.  तसेच रियाला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी आता कंगनाला दिलेल्या शब्दाला जागत पुरस्कार परत करण्याचं आवाहन केलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर निशाणा साधला होता. तसेच सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिने म्हटले होते. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेली. कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मुंबई पोलिसांनी मला बोलवले होतो. पण मी मनालीमध्ये असल्यामुळे कोणाला तरी माझा जबाब रेकॉर्ड करण्यासाठी पाठवा अशी मी त्यांचाकडे मागणी केली. पण माझ्या विनंतीनंतर मला मुंबई पोलिसांकडून काहीच उत्तर मिळाले नाही. मी तुम्हाला सांगते, जर मी असे काही बोलले असेल जे मला सिद्ध करुन दाखवता येणार नाही. तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन’ असं म्हणाली होती.

आता याच मुलाखतीचा संदर्भ देत अनेकांनी कंगनाला पुरस्कार परत करावा असं सांगितलं आहे.  अभिनेत्री स्वरा भास्करने कंगना रणौतचा थेट उल्लेख न करता तिच्यावर निशाणा साधला आहे. “सुशांतने आत्महत्याच केली होती हे आता सीबीआय आणि एम्सच्या रिपोर्टवरुन सिद्ध झालं आहे. कोणीतरी आपला पुरस्कार सरकारला परत देणार होतं ना?” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वराच नाही तर ट्विटरवर बुधवारी रात्री #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग वापरुन हजारो ट्विट करण्यात आले होते.

ती म्हणाली होती…

पॅरडी अकाऊंटवरुनही टोला

बायो बदलण्याचाही सल्ला

तिला आठवत असावं अशी अपेक्षा

हे असं झालं असेल म्हणे

सुरुवात आणि शेवट

एक नंबरला ट्रेण्ड झाला हॅशटॅग

विरोधाभास बघताय ना

पुरस्कार परत द्यायला जाताना

परत दे

बोल की आता

एवढे सगळे एकत्र आले

गर्दीतला एक चेहरा

कंगना आणि तिचे ८० हजार फॉलोअर्स

एम्सच्या अहवालात काय?

सुशांतची हत्या झाल्याचा दावा खोडून काढणाऱ्या एम्सच्या रिपोर्टमध्ये हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.