News Flash

Video : केजरीवालांना ट्रोल करण्यासाठी कपिल मिश्रानं आणलं ‘सोनू’ला!

'दिल्लीचा सीएम चोर है!'

व्हिडिओ तयार करून कपिल मिश्रान यांनी केजरीवालांना ट्रोल केलं आहे

दिल्लीतील माजी मंत्री आणि आपचे बंडखोर नेते कपिल मिश्रा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातून विस्तव जात नाही. काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत यांनी इतर राजकीय पक्षांना चर्चेसाठी नवा विषय दिला होता. आता हे प्रकरण निस्तरत नाही तोच कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पण यावेळी मिश्रा यांनी केजरीवाल यांना खिजवण्यासाठी ‘सोनू’लाच मध्ये आणलंय. आता सोनू कोण हे वेगळं सांगायला नको! सध्या देशात ‘सोनू’ची हवा आहे. तेव्हा मिश्रा यांनी सोनूचं नवं व्हर्जन तयार करत अरविंद केजरीवाल यांना कधीही विसरू शकणार नाही, अशी वाढदिवसाची भेट दिली आहे.

‘गली गली मे शोर है, दिल्लीका सीएम चोर है’ म्हणत त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. सुरूवातीला केजरीवाल यांच्यविरोधात घोषणा देत नंतर कपिल मिश्रा स्वत: सोनूचं नव्या व्हर्जनचं गाणं गात त्यांच्यावर आरोप केले. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कालच म्हणजे १६ ऑगस्टला अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस होता आणि हिच वेळ साधून कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांना ट्रोल करण्याची हातात चालून आलेली आयती संधी सोडली नाही.

आता तुम्हीच पाहा ‘सोनू’ला मध्ये आणून कपिल मिश्रा यांनी केजरीवालांना कसं ट्रोल केलंय ते…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 11:57 am

Web Title: kapil mishra troll delhi cm arvind kejriwal on his birthday ak teri kursi gol sonu version
Next Stories
1 Viral Video : हा पर्वत चढण्यासाठी फार हिंमत लागते बुवा!
2 या कुटुंबातील तीन पिढ्या पायलट
3 Viral Video : अरे हे तर भित्र्या सशाच्या गोष्टीसारखंच झालं!
Just Now!
X