News Flash

ना घोडा, ना गाडी त्यानं नववधूला जेसीबीमधून आणलं घरी!

सोशल मीडियावर ही वरात चर्चेचा विषय ठरली नाही तर नवलं. चेतन असं या नवरदेवाचं नाव आहे.

चेतन असं या नवरदेवाचं नाव आहे. चेतन पेशानं जेसीबी चालक आहे.

कर्नाटकमध्ये एक अजब वरात पाहायला मिळाली, या वरातीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कारण नवरदेवानं गाडीतून नाही तर चक्क जेसीबीमधून आपल्या नववधूला घरी आणलं आहे.

चेतन असं या नवरदेवाचं नाव आहे. चेतन पेशानं जेसीबी चालक आहे. म्हणूनच तो घोडी किंवा कारनं न येता जेसीबी चालवत लग्नमंडपात पोहोचला. जेव्हा चेतनची वरात निघाली तेव्हा त्यानं आपल्याला पत्नीला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवलं आणि तो स्वत:ही पत्नीच्या शेजारी बसला यावेळी चेतनचा मित्र ट्रक चालवत होता. त्यामुळे सोशल मीडियावर ही वरात चर्चेचा विषय ठरली नाही तर नवलं. जेसीबीवर माझा उदरनिर्वाह चालतो. लग्न हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे, त्यामुळे माझ्या गाडीनंही माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचं साक्षीदार व्हावं असं मला वाटतं होतं. या वाहनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लग्नमंडपात जेसीबी घेऊन आलो असं चेतन एका मुलाखतीत म्हणाला. चेतननं आपल्या जेसीबीला अगदी नववधुप्रमाणे सजवलं होतं. अनेकांनी चेतनचं कौतुकही केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 2:39 pm

Web Title: karnataka couple wedding procession come in jcb machine
Next Stories
1 पंतप्रधानांना कन्यारत्न !
2 3 मिनिटे लवकर जेवायला गेल्यानं कर्मचाऱ्याचा पगार कापला
3 अजब-गजब! कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी संपूर्ण देशात इंटरनेट बंदी
Just Now!
X