28 September 2020

News Flash

भन्नाट…फक्त ३० सेकंदात नारळाच्या झाडावर चढणारी बाईक

२८ किलो वजन असणाऱ्या या मोटारवर एका वेळी एक माणूस बसू शकतो

के गणपति भट्ट

नारळ आणि सुपारीच्या झाडांवर चढणे कठीण काम आहे. मात्र कर्नाटकच्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने यावर एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. के गणपति भट्ट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. भट्ट यांनी एक मोटार तयार केली आहे. या मोटारीव्दारे नारळ आणि सुपारीच्या झाडांवर चढणे सोपे झाले आहे. कर्नाटकात झाडांवर चढणाऱ्या मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळेच या प्रकारचे संशोधन भट्ट यांनी केले आहे.

२८ किलो वजन असणाऱ्या या मोटारवर एका वेळी एक माणूस बसू शकतो. ३० सेकंदात हे वाहन झाडावर पोहचू शकते. ही मोटार एक लीटर पेट्रोलमध्ये ८० झाडांवर चढू शकते. पावसाळ्यात सुपारी आणि नारळांच्या झाडांवर कीड लागते, त्या वेळी किटकनाशकांची फवारणी करावी लागते. किटकनाशक औषधं घेऊन इतक्या वर चढणे कधी कधी शक्य होत नाही. अशा वेळी या मोटारीचा उपयोग नक्कीच होऊ शकतो.

२८ किलो वजन असणाऱ्या या मोटारीमध्ये टू स्ट्रोक इजिंन असून ही मोटार खाली पडून कोणी जखमी होऊ नये यासाठी शॉक अर्ब्सोर्बेर आणि हायर्डोलीक ड्रमचा वापर करण्यात आला आहे. या मोटारीची किंमत ७५००० सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 6:37 pm

Web Title: karnataka farmers invention climb trees coconut tree bike abn 97
Next Stories
1 वाहतूक पोलिस म्हणतो “अपना टाइम आएगा”; जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम
2 लवकरच लोकल ट्रेनप्रमाणे विमानातही उभं राहून करता येणार प्रवास
3 दुर्मिळ! 40 वर्षांनी ध्रुवीय अस्वलाचं ‘दर्शन’, उपासमारीमुळे घरापासून शेकडो मैलांवर
Just Now!
X