News Flash

अनोखळी व्यक्तींना पाठवायचा न्यूड फोटो; पोलिसांनी केली अटक

त्याने ज्या २०० जणांना फोटो पाठवले त्यामध्ये १२० महिलांचाही समावेश

प्रातिनिधिक फोटो

कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका ५४ वर्षीय इसमाला पोलिसांनी अटक केली असून या इसमाने नग्नावस्थेतील अश्लील फोटो २०० अनोळखी लोकांना पाठवल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने मागील सहा महिन्यामध्ये ज्या २०० जणांना हे फोटो पाठवले आहेत त्यामध्ये १२० महिलांचाही समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव ओ. रामकृष्णन् असं असून त्याला पोलिसांनी मागील शुक्रवारी ताब्यात घेतलं. चल्लाकेरी येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरुन अश्लील फोटो पाठवले जात होते. यासंदर्भात पोलिसांकडेही काही जणांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर या आरोपीचा फोन स्वीच ऑफ असल्याने तपासाला फारसे यश मिळाले नाही. मात्र मागील शुक्रवारी आरोपीने फोन सुरु केला आणि त्यानंतर पोलिसांनी आपल्या आयटी सेलच्या मदतीने या व्यक्तीची लोकेशन शोधून काढली व त्याला अटक केली.

पोलिसांनी रामकृष्णनची चौकशी केली असताना आपण अनेक अनोखळी क्रमांकांवर अश्लील फोटो पाठवल्याचे त्याने कबुल केलं. आपण कोणताही दहा आकडी क्रमांक डायल करायचो आणि फोनची रिंग झाल्यास तो कट करुन त्या क्रमांकावर अश्लील फोटो पाठवायचो, असंही रामकृष्णन याने पोलिसांना सांगितलं. रामकृष्णनने चल्लाकेरीमधील ५० हून अधिक महिलांना असे अश्लील फोटो पाठवले आहेत. मात्र या महिलांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र शुक्रवारी रामकृष्णनला अटक झाल्यानंतर अनेक महिलांनी पोलिसांकडे त्याच्याविरोधात तक्रार केली आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत रामकृष्णनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 8:18 am

Web Title: karnataka man sends nude photos to 200 unknown people including 120 women arrested scsg 91
Next Stories
1 डोळ्यांवर गॉगल, हातात चहाचा कप, ‘स्पोर्ट्समन’ राज ठाकरेंचा टेनिस कोर्टमधला फोटो व्हायरल
2 रेल्वेच्या लोको पायलटनं वाचवले तीन हत्तींचे प्राण; पीयूष गोयल यांनी शेअर केला व्हिडीओ
3 दिवाळी बोनस आणि ऑफिसवरील भन्नाट मीम्स
Just Now!
X