होळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा सण. मात्र प्रत्येक गावात, शहरात होळी, रंगपंचमी साजरी करण्याती वेगवेगळी पद्धत असते. साधारणपणे रंग खेळण्यासाठी आपण पाणी, रंग यांचा वापर करतो. मात्र एक ठिकाणं असं आहे, जेथे चक्क चितेच्या राखेपासून होळी खेळली जाते.

खरंतर पूर्वीपासून राखेपासून होळी खेळण्याची प्रथा आहे. मात्र होळीचं दहन केल्यानंतर जी राख शिल्लक राहते त्यापासून होळी खेळली जायचं. मात्र एका ठिकाणी होळीच्या राखेपासून होळी न खेळता चक्क चितेच्या राखेपासून होळी खेळली जाते. असं म्हटलं जातं वाराणसीमध्ये जे होळी खेळली जाते त्यात चितेच्या राखेचा समावेश असतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, वाराणसी, काशीमध्ये चितेच्या राखेपासून होळी खेळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. ही तेथील एक परंपरा आहे. वाराणसीमध्ये रंगभरी एकादशी साजरी केली जाते. असं म्हटलं जातं की, भगवान शंकराने गौरीसोबत होळी खेळली होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकराच्या भक्तांनी चितेच्या राखेपासून होळी खेळली होती. तेव्हापासून ही प्रथा सुरु आहे.

वाचा : ‘माझ्या नवऱ्यापासून दूर रहा’; भारतीने दिली ‘या’ अभिनेत्रीला ताकीद

वाराणसीमधील ‘मणिकर्णिका घाट’ म्हणजेच ‘महाश्मशान घाट’ येथे लोक एकत्र येऊन बरोबर १२ वाजता श्मशानेश्वर महादेव मंदिरात शंकराची आरती करतात. त्यानंतर जळत असलेल्या चितेमधील गरम राख काढून त्यापासून होळी खेळण्यास सुरुवात करतात. विशेष म्हणजे ही होळी खेळण्यासाठी लोक दूरदूरवरुन येतात.

वाचा : Happy Holi 2020 : असा स्वच्छ करा चेहऱ्यावरील रंग!

दरम्यान, ‘मणिकर्णिका घाट’ हे वाराणसीमधील प्रसिद्ध ठिकाण असून याविषयी बऱ्याच दंतकथा आहेत. असं म्हटलं जातं की, पार्वतीची कर्णफुले येथील कुंडामध्ये हरवले होते, जे भगवान शंकरांनी शोधून काढले त्यामुळे या ठिकाणाला ‘मणिकर्णिका घाट’ असं म्हणतात.