News Flash

viral video: काश्मीरमध्ये क्रिकेटपटूंनी सामन्याआधी गायले पाकिस्तानी राष्ट्रगीत

हिरव्या रंगाची जर्सीही घातली

काश्मीरमध्ये आयोजित क्रिकेट सामन्यांवेळी एका संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी राष्ट्रगीत गायले.

जम्मू – काश्मीरमध्ये खेळवण्यात आलेल्या एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंनी पाकिस्तानाची पारंपारिक हिरव्या रंगाची जर्सी आणि पाकिस्तानी राष्ट्रगीत गायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील आयोजित क्रिकेटच्या सामन्यावेळी हा व्हिडिओ शूट केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. हा व्हिडिओ २ एप्रिलचा असून, याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेनानी-नाशरी बोगद्याच्या उद्घाटनासाठी गेले होते. फुटीरतावाद्यांनी याच दिवशी काश्मीर खोऱ्यात बंदची घोषणा केली होती. वृत्तानुसार, बाबा दरयाउद्दीन संघाच्या खेळाडूंनी सामन्यावेळी पाकिस्तानच्या पारंपरिक हिरव्या रंगाची जर्सी घातली होती. तर प्रतिस्पर्धी संघाने पांढऱ्या रंगाची जर्सी घातली होती. सामना सुरु होण्याआधी पाकिस्तानी राष्ट्रगीत वाजवले जाईल, अशी घोषणा ध्वनिक्षेपकावरून करण्यात आली. आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे, असे संघातील खेळाडूंना वाटले. याशिवाय काश्मीरचा मुद्दा आम्ही विसरलो नाही, याची जाणीव करून द्यायची होती. यासाठी ही थीम आम्ही निवडली, असे या संघाच्या एका खेळाड़ूने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका संकेतस्थळाला सांगितले.

दरम्यान, काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या घटना किंवा प्रकार नवीन नाहीत. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान आणि आयसिससारख्या दहशतवादी संघटनांचे झेंडेही फडकावले जातात. याशिवाय काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर येथील तरुणांकडून दगडफेक केली जात आहे. या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये सहभागी झालेल्या संघांना दहशतवाद्यांची नावे देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2017 2:26 pm

Web Title: kashmir local cricket club cricketers sings pakistani anthem wears pakistani uniform
Next Stories
1 रिलायन्स जिओची DTH सेवा सुरूवातीला मोफत?
2 केरळच्या प्रेमात असलेल्या आई-वडिलांनी मुलीचे नाव ठेवले ‘केरळ’
3 नऊ गोळ्या लागूनही CRPF जवान चेतनकुमार चिताह सुखरूप
Just Now!
X