गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर धुमसतंय आणि काश्मिरी बंडखोरांचा हा असंतोष आणखी वाढू नये, यासाठी काश्मीर खोऱ्यात सोशल मीडियापासून ते अनेक वाहिन्यांवर बंदी घातली होती. तेव्हा १६ वर्षांच्या एका काश्मिरी मुलाने फक्त काश्मिरी तरुणांसाठी एक सोशल नेटवर्किंग वेबसाईट बनवली आहे. फेसबुकवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर काश्मीर खोऱ्यात फेसबुकवर बंदी घालण्यात आली. तेव्हा अनंतनाग इथे राहणाऱ्या झियान शाफिक या मुलाने ‘फेसबुक’सारखीच एक सोशल नेटवर्किंग साईट बनवली आहे आणि त्याला ‘काशबुक’ असे नाव दिले आहे.

आतापर्यंत काश्मीर खोऱ्यातल्या एक हजारांहून अधिक युजर्सने हे काशबुक वापरायला सुरूवात केली आहे. या नेटवर्किंग साईटवर संवाद साधण्यासाठी काश्मिरी भाषेचा पर्याय देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर काश्मिरी व्यावसायिक त्यांच्या वस्तू विकण्यासाठी किंवा व्यवसायवृद्धीसाठी या काशबुकचा वापर करू शकतात. काश्मिरी जनतेच्या अधिक पसंतीस ही साईट उतरत आहे. झिआनने आणि उझेरने काशबुक अॅपही बनवले आहे. ज्याचा उपयोग करून युजर्स एकमेकांसोबत चॅटिंग देखील करू शकतात. झिआन उझेर याने २०१३ मध्येच काशबुक तयार केले होते. विशेष म्हणजे झिआन अकरा वर्षांचा असतानाच त्याने HTML टॅग शिकायला सुरूवात केली होती. गेल्या वर्षांपासून फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर आपले काशबुक युजर्ससाठी वापरात आणण्याचा निर्णय या दोघांनी घेतला.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा