काश्मीर खोरं गेल्या वर्षभरापासून धुमसत आहे. लष्कराचे जवान आणि स्थानिक तरुणांमध्ये वाद होताहेत. तरुणांचा जमाव जवानांवर दगडफेक करत आहेत. गेल्या वर्षभरात दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक आणि जवानांमध्ये वाद असला तरी ‘कश्मिरीयत जिंदा है!…’ची प्रचिती अनुभवायला मिळालीय. झालं गेलं विसरून जात पहरु येथील ग्रामस्थ जखमी जवानांच्या मदतीला धावून आले. अपघातात जखमी झालेल्या जवानांची मदत करून ‘कश्मिरीयत’ अजूनही जिवंत आहे हेच या ग्रामस्थांनी दाखवून दिलं आहे.

पहरु येथे जवानांच्या व्हॅनला अपघात झाला. यात काही जवान जखमी झाले. रविवारी सकाळी हा अपघात झाला होता. अपघाताची बातमी समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी जवानांना त्यांनी पाणी दिलं, तसंच त्यांची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.