राजघराण्यातील लोकांकडे तसे भरपूर दागिने असतात. त्यांच्या खजिन्यात लाखो, कोट्यवधी किंमतीचे कितीतरी दागिने असल्याचे आपण ऐकले किंवा पाहिले असेल. त्यातून ब्रिटनच्या राजघराण्यातील स्त्रियांकडे सर्वाधिक, मौल्यवान, दुर्मिळ दागिने असतील याबद्दल आपण अनेक तर्कवितर्क बांधले असतील. एकदा का एखादा दागिना परिधान केला तर दुसऱ्यावेळी राणीच काय पण राजपरिवारातल्या अन्य स्त्रियादेखील तो पुन्हा घालत नसतील असाही अनेकांचा समज असेल.

पण राणी एलिझाबेथ यांच्या लग्नाच्या ७० व्या वाढदिवासाठी केट मिडलटन हिनं चक्क त्यांचाच हार उसना घेतला होता. केट मिडलटन यांच्या गळ्यातील हिरे आणि मोत्यांच्या सरीच्या हारानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि तो हार पाहिल्यावर सगळेच भूतकाळाच्या आठवणीत रमले. राणी एलिझाबेथ यांनी तो हार अनेकदा घातला होता. हा हार त्यांना सासूकडून भेट मिळाला होता.

ऐकावे ते नवलच! लंडनमध्ये बसच्या इंधनासाठी कॉफीचा वापर

Video : छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंडिगोच्या एअरहॉस्टेसनं घेतली ‘शाळा’

पुढे हा हार राजकुमारी डायना यांनीही घातला होता. त्यांना मोत्यांच्या दागिन्यांची आवड होती. त्यांच्याकडे मोत्यांचे शेकडो दागिने होते पण, एलिझाबेथ यांचा मोत्यांच्या सरीचा हार त्यांचा सर्वात आवडता होता त्यामुळे डायना यांनी एका कार्यक्रमासाठी तो हार उसना घेतला होता. हा हार परिधान केलेला डायनाचा फोटो त्यावेळी ‘स्टाईल स्टेटमेंट’ ठरला होता. अनेकींनी तशाच प्रकारचा दागिना घडवून घेतला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी केट हिने राणी एलिझाबेथ आणि राजे फिलीप यांच्या लग्नाच्या ७० व्या वाढदिवसादिवशी तो परिधान केला, त्यामुळे त्याकाळी स्टाईल स्टेटमेंट ठरलेला हा मौल्यवान हार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.