02 March 2021

News Flash

‘बॉलिवूड स्टाईल’ स्वच्छतेचे बाळकडू!

"मेरे मुँह में पान है, 'DEEWAR' पर मत थूकना."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेताच स्वच्छतेवर भर देत ‘स्वच्छ भारत’ अभियान राबवायला सुरुवात केली. देशवासियांनीदेखील पंतप्रधानांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते. राजकीय नेते, सरकारी कर्मचारी, सेलेब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतल्याचे पाहायला मिळाले. स्वच्छता करतानाची छायाचित्रेदेखील सोशल मीडियावर झळकली. फोसबुक आणि टि्वटरसह समाजमाध्यमांवर याची भरपूर चर्चा झाली. स्वच्छतेबाबत देशातील जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियानेदेखील मोलाचा वाटा उचलला. स्वच्छतेसंदर्भातील अशीच काही छायाचित्रे अलिकडेच फेसबुक, व्हॉटस्अॅप आणि टि्वटरवर फिरताना पाहायला मिळत आहेत. स्वच्छतेचा संदेश देणारी पोस्टर्स रेल्वेस्थानकावर लावण्यात आल्याचे या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या सत्यतेबाबत साशंकता असली तरी पोस्टर्समधील कल्पकतेला दाद द्यावी लागेल. भारतीय माणूस आणि बॉलिवूडचे खास नाते आहे. या पोस्टर्समध्ये बॉलिवूडप्रेमाचा धागा पकडून स्वच्छतेचे बाळकडू पाजण्यात आले आहे. रेल्वे परिसरातील घाणीचे साम्राज्य हा अतिशय गंभीर विषय आहे. रेल्वेगाडी आणि रेल्वेचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतचे होर्डिंग लावण्यापासून प्रवाशांना उद्घोषकावरून सूचना देण्यापर्यंत रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. रेल्वेचे सफाई कार्मचारीदेखील वारंवार फलाट आणि गाड्यांची सफाई करत असतात. रेल्वे प्रशासनाबरोबरच प्रवाशांचीदेखील रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्याची तितकीच जबाबदारी असून, स्वच्छतेचा संदेश देणारी ही पोस्टर्स नक्कीच विचार करायला लावणारी अशी आहेत.

‘दिवार’ हा बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट. यातील संवाद आजही चित्रपटरसिकांच्या मनात घर करून आहेत. त्याचा उत्तम वापर करत हे पोस्टर साकारण्यात आले आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचे छायाचित्र असलेल्या या पोस्टरवर “मेरे पास रेलगाडी है, रिजर्व सीट है, टि्वटर है, तुम्हारे पास क्या है, मेरे मुँह में पान है, ‘DEEWAR’ पर मत थूकना.” असा संदेश लिहिला आहे.

img-20160930-wa0005

बॉलिवूडचा अन्य सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. शाहरुख ट्रेनच्या दरवाज्यात उभा असून फलाटावरून काजोल ट्रेनमागे धावत असलेल्या दृश्याचा वापर या पोस्टरमध्ये मोठ्या खुबीने करण्यात आला आहे. “जा सिमरन जा, प्लॅटफॉर्म भी साफ करते हुए जा” असा संदेश या पोस्टरवर देण्यात आला आहे.

img-20160930-wa0004-1

बाबूमोशाय म्हटलं की बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना डोळ्यासमोर येतात. राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील एक दृश्य या पोस्टरवर झळकले आहे. पोस्टरवर चित्रपटातील त्यांचा एक संवाद काहीशा अशा स्वरुपात लिहिण्यात आला – “कब, कौन, कहाँ कूडा गिरायेगा… यह कोई नहीं बता सकता”

img-20160930-wa0003

‘शोले’ चित्रपटातील संवादांचे तर प्रत्येक पिढीच्या मनावर गारूड आहे. ‘शोले’मधील गब्बरची दहशत आजही कमी झालेली नाही. या पोस्टरवर गब्बर सिंग त्याच्या खास शैलीत दिसत असून, चित्रपटातील त्याच्या एका संवादाचा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मोठ्या खुबीने वापर करण्यात आला आहे. “अरे ओ साँभा कितना जुर्माना रखे हैं सरकार गंदगी फैलाने पर 500 रुपये… पुरे 500.” असा हा संदेश आहे. ही पोस्टर्स कोणत्या रेल्वेस्थानकावर लावण्यात आली आहेत अथवा त्यांच्या सत्यतेबाबत साशंकता असली तरी सोशल मीडियावरून फरणारी ही पोस्टर्स नक्कीच प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्यास मदत करतील, अशी आशा करायला हरकत नाही.

img-20160930-wa0002

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 3:51 pm

Web Title: keep railway clean bollywood style posters
Next Stories
1 VIRAL VIDEO : मारहाण करण्या-या शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी बनवला व्हिडिओ
2 आता प्रकाशामुळे कपडे होणार स्वच्छ
3 पत्नीने घर सोडल्यावर पतीचा शोले स्टाईल स्टंट
Just Now!
X