केरळच्या एका 12 वर्षाच्या मुलाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्याने फक्त कागदांचा वापर करुन एक ट्रेनचं मॉडेल तयार केलं आहे. हे ट्रेनचं मॉडेल इतकं शानदार आहे की, थेट भारतीय रेल्वेनेही या मुलाच्या क्रिएटीव्हीटीचं कौतुक केलंय.

अद्वैत कृष्णा नावाचा हा सातवीत शिकणारा चिमुकला केरळच्या त्रिशूर येथील रहिवासी आहे. त्याने फक्त वृत्तपत्रांची रद्दी वापरुन एक सुंदर ट्रेन मॉडेल तयार केलं. तेही लॉकडाउनदरम्यान अवघ्या तीन दिवसांमध्ये. त्याने तयार केलेलं हे ट्रेन मॉडेल सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आणि भारतीय रेल्वेनेही त्याची दखल घेतली आणि अवघ्या तीन दिवसांमध्ये बनवलेल्या मोहक रेल्वे मॉडेलचं कौतुक केलं.


या रेल्वे मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी मंत्रालयाला त्याची कलाकृती जपून ठेवावी असं सूचवलं आहे.