सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकजण आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करताना दिसत आहे. मात्र ट्विटवर सध्या चर्चा आहे केरळमधील एका जोडप्याच्या लग्नपत्रिकेची. या जोडप्याने त्यांमधील केमिस्ट्री चक्क आपल्या पत्रिकेतून दाखवली आहे. या दोघांनी चक्क रासायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या थीमवर आधारित लग्नपत्रिका छापली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनाही या आगळ्यावेगळ्या पत्रिकेची भूरळ पडली आहे.

विथून शेखर आणि सूर्या नायर या दोघांनी आपल्या लग्नपत्रिकेमध्ये रसायनशास्त्रातील चिन्हे वापरली आहेत. विथून आणि सूर्या दोघेही रसायनशास्त्राचे शिक्षक आहेत. म्हणजेच रसायनशास्त्रात सुत्रे लिहिताना किंवा एखाद्या रसायनाचे नाव लिहीताना त्याचे पहिले अक्षर वापरले जाते त्याचप्रमाणे Va बॉण्ड Sa असे चिन्हांमधून दाखवण्यात आले आहे. हे दोन्ही अणू एकमेकांशी जोडलेले दाखवण्यात आले आहेत. तर पत्रिकेवरील इतर पानांवर केमिस्ट्रीने आम्हाला एकत्र आणले अशा आशयाचा मेसेज लिहीण्यात आला आहे. ‘विथून आणि सूर्या या दोन अणूंने आपल्या आई वडिलांच्या अॅक्टीव्हेशन एनर्जीच्या मदतीने मॉलिक्यूल होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाँडिंग समारंभासाठी सर्वांनी आपल्या प्रोडक्ट्ससहीत उपस्थित रहावे ही विनंती करत आहोत’ असे आगळेवगेळे आमंत्रण पत्रिकेत देण्यात आले आहे.

आधी ही पत्रिका सुर्यानेच फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर ही कल्पना अनेकांना आवडल्याने या पत्रिकेचे फोटो व्हायरल झाले.

अगदी शशी थरुर यांनीही या पत्रिकेचे फोटो रिट्वीट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या. थरुर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘या दोघांनाही वैवाहिक सुखी जिवनासाठी शुभेच्छा. दोघांमधील केमिस्ट्री अशीच राहो. तसेच फिजिक्सच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या भविष्यात हिटपेक्षा (वाईटापेक्षा) उजेड जास्त रहवो. आणि बायोजॉलिजच्या भाषेत सांगायचे तर उदार संतती प्राप्त होवो.’

बरं या पत्रिकेच्या प्रेमात फक्त थरुरच पडले असं नाही तर रसायनशास्त्र समजणाऱ्या अनेकांनी या पत्रिकेच्या कल्पनेचे कौतूक केले. जाणून घेऊयात याबद्दल काय म्हणाले नेटकरी…

म्हणून लग्न संध्याकाळी हवे

त्यांना आयुष्यात स्टेबिलिटी लाभो

ही पाहा पत्रिका

ट्विट वाचून छान वाटलं

केवळ लग्न नाहीतर रिअॅक्शन आहे

असाही या पत्रिकेचा अर्थ

आजच या दोघांचे लग्न झाले असून दोघांनाही सुखी संसारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना दोघांमधील केमिस्ट्री अशीच कायम राहवो असंच नेटकरीही म्हणत आहेत.