28 February 2021

News Flash

शिक्षणासाठी मासेविक्री करणाऱ्या तरुणीला सोशल मीडियामुळे मिळाली चित्रपटात भूमिका

तिच्या जिद्द आणि धाडसाला केला अनेकांनी सलाम

कोणाचे नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. घरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे केरळमधील एका तरुणीला मासेविक्री करुन पैसे कमवावे लागत होते. हे पैसे ती आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमवत होती. पण माध्यमातून तिच्यावर आलेल्या बातमीचा चांगलाच परिणाम झाला. विशेष म्हणजे याला सोशल मीडिया कारणीभूत ठरला. माध्यमात झळकलेल्या या मुलीची कहाणी वाचून तिला अनेक स्तरातून मदतीचा हात आला आणि विशेष म्हणजे तिच्या संघर्षामुळे तिला एका दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात भूमिका दिली.

केरळमधील सर्वाधिक खप असलेल्या ‘मातृभूमी’ या वृत्तपत्राने हनन हमीद या तरुणीबाबतची बातमी केली होती. ती एका खासगी महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेते. तिचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु होतो. त्यानंतर एक तास अभ्यास करुन ती सायकलवर बाजारात जाते. तिथून मासे करेदी करुन ती आपल्या ओळखीच्यांकडे हे मासे नेऊन ठेवते. पुन्हा घरी येऊन आवरुन ती ६० किलोमीटरवर असलेल्या कॉलेजला बसने जाते. दिवसभर कॉलेजमध्ये हजेरी लावून ती संध्याकाळी हे मासे विकायला पुन्हा त्या गावी जाते.

तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून तिच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे. तर तिची आई मानसिकरित्या ठिक नसल्याने तिला अशाप्रकारे आर्थिक तजवीज करण्यासाठी काम करावे लागते. याबरोबरच आपल्या कॉलेजच्या फी भरण्यासाठी ती लहान मुलांचे क्लासेसही घेते. हनन हीला अभिनय, डबिंग, कविता करणे यामध्ये विशेष रस असून तीला कलरीपायाट्टू हा मार्शल आर्टही येतो. तिची ही कहाणी फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटवरुन व्हायरल झाल्यानंतर तिच्या जिद्दीला आणि धाडसाला लोकांनी सलाम केला. राजकीय नेते, अभिनेते आणि दिग्दर्शकही तिच्या या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी पुढे आले. अरुण गोपी या दिग्दर्शकाने तिला चित्रपटाची ऑफरही दिली.

दुसरीकडे तिला चित्रपटात काम मिळावे यासाठी ती अशापद्धतीने स्वत:चे मार्केटींग करत असल्याचा आरोप अनेकांनी तिच्यावर केला आहे. तर माझा इयत्ता ७ वीमध्ये असल्यापासून संघर्ष सुरु असल्याचे तिने मातृभूमी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मी ज्युनियर आर्टीस्ट म्हणून अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र मी कधीच कोणत्या दिग्दर्शकांना स्वत:हून अॅपरोच झालेली नव्हते. ती ज्या महाविद्यालयात शिकते तेथील शिक्षकांनीही तिची परिस्थिती खडतर असल्याचे सांगत तिच्या वृत्ताला पाठिंबा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 8:30 pm

Web Title: kerala girl fish seller hanan mathrubhumi report give her movie role social media effect
Next Stories
1 Video : शहराच्या मध्यभागीच इमारतीवरुन कोसळणारा धबधबा
2 फेसबुकवर आता Group Party, जाणून घ्या काय आहे हे
3 #ImranKhan : या वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत राहिले इम्रान खान
Just Now!
X