14 October 2019

News Flash

IIM-नागपूरच्या विद्यार्थ्याला १९ लाखांचा वार्षिक पगार, थक्क करणारी यशोगाथा

त्याच्या कुटुंबियांचा वडिलोपार्जित कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे. जस्टीनच्या घरचं वार्षिक उत्पन्न फक्त ५० हजारांच्या आसपास आहे. हैदराबादमधल्या कंपनीनं १९ लाखांचा वर्षिक पगार त्यांना देऊ

जस्टीन मुळचा केरळमधला आहे. (छाया सौजन्य : Studentslifeguide/ फेसबुक)

‘इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ मॅनेजमेंट’ नागपूरमधून शिकलेल्या जस्टीन फर्नांडिस या २७ वर्षीय तरुणाला एका कंपनीनं १९ लाखांचा वर्षिक पगार देऊ केला आहे. १९ लाखांचा वार्षिक पगार असलेला IIM- नागपूरमधला तो पहिलाच विद्यार्थी आहे. त्यामुळे साहजिकच जस्टीनच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना आहे. एका गरिब कुटुंबात जन्मलेल्या जस्टीनचा प्रवास हा थक्क करणारा तर आहेच पण, तितकाच प्रेरणादायीदेखील आहे.

जस्टीन मुळचा केरळमधला. त्याच्या कुटुंबियांचा वडिलोपार्जित कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रेडिमेड गार्मेंटच्या काळात कपडे शिवून घेण्याचं प्रमाण खूपच कमी झालं. साहजिकच त्यांच्या कुटुंबियांचं वार्षिक उत्पन्न घटलं. दोन वेळच्या जेवणाचीही अबाळ होऊ लागली. घरची परिस्थिती हालाखीची असली तरी जस्टीनच्या आत्यानं कधीही त्याच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. जस्टीनच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च त्याच्या आत्यानं केला. जस्टीनच्या घरचं वार्षिक उत्पन्न फक्त ५० हजारांच्या आसपास होतं. शिक्षणच जस्टीनच्या घरीची परिस्थिती सुधारू शकतं असा विश्वास त्याच्या आत्याला होता. त्यामुळे जस्टीननंही अभ्यासात खूप मेहनत घेतली. केरळमधल्या सरकारी महाविद्यालयातून त्यानं बीटेक पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

एमबीएसाठी त्याला कोझीकोडेमधल्या IIMमध्ये प्रवेश मिळाला नाही. अखेर त्यानं IIM नागपूरमध्ये प्रवेश घेतला. इथून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर हैदराबादमधल्या कंपनीनं त्याला १९ लाखांचं पॅकेज देऊ केलं आहे. नागपूर IIMमधून सर्वाधिक पगार मिळणारा जस्टीनं हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे असं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

First Published on April 19, 2018 11:38 am

Web Title: kerala tailor son lands rs 19 lakh studied in iim nagpur