News Flash

कॅन्सर नसताना दिली केमोथेरपी; महिलेची झाली वाताहत

एका सरकारी रूग्णालयाच्या निषकाळजीपणाचा एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

केरळमधील एका सरकारी रूग्णालयाच्या निषकाळजीपणाचा एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्टयम येथील एका महिलेला खासगी लॅबमध्ये कॅन्सरचे निदान असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यावर केमोथेरपीद्वारे कोट्टयम सरकारी रूग्णालयात उपचार सुरू झाले. पण काही दिवसांनंतर सरकारी रूग्णालयाच्या रिपोर्ट्समध्ये त्या महिलेला कॅन्सर झालाच नव्हता असे समोर आले.

कॅन्सर नसताना केमोथेरपीचा उपचार केल्यामुळे त्या महिलेची वाताहत झाली आहे. त्या महिलेची शारिरीक हानी झाल्याचं समोर आले आहे. महिलेचे पैसे तर गेलेच शिवाय तिच्या डोक्यावरील केसही गेले आहेत. या सर्व प्रकरणावर केरळ सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. खासगी लॅबमधील रिपोर्ट्सच्या आधारावर रुग्णालयात केमोथेरपीचा उपचार केल्याचे या प्रकरणावर एका आधिकाऱ्यांने सांगितले. सत्य समोर आल्यानंतर केरळ आरोग्यमंत्री के.के शैलेजा यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

मवेलिक्कारामध्ये राहणारी रजनी म्हणाली की, ‘ब्रेस्टमध्ये गाठ आल्यामुळे २८ फ्रेबुवारी रोजी जनरल सर्जरी विभागात उपचार सुरू होता. तेथे रक्ताचे नमने दिले. ते नमुने सरकारी आणि खासगी लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवले. खासगी लॅबच्या रिपोर्टमध्ये कॅन्सरचे निदन झाले. रिपोर्ट्स मिळाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ केमोथेरपीचा उपचार सुरू केला. दोन आठवड्यानंतर सरकारी रूग्णालयाचा रिपोर्ट समोर आला. त्यावेळी तो रिपोर्ट पाहून सर्वजण अवाक झाले. कारण मला कॅन्सर झालाच नव्हता.’

या सर्व प्रकरणानंतर केमोथेरपीचे उपचार थांबवण्यात आले. त्यानंतर ऑन्कोलॉजी विभागाने तिला जनरल सर्जरी विभागामध्ये ट्रान्सफर केलं. जनरल सर्जरी विभागामध्ये त्या महिलेच्या ब्रेस्टमध्ये असलेली गाठ काढण्याचा उपचार झाला. खासगी लॅबमध्ये दिलेले सँम्पलची पुन्हा तपासणी करण्यात आली. सरकारी रूग्णालय आणि तिरुअनंतपुरममधील राष्ट्रीय कॅन्सर केंद्रामध्ये (आरसीसी) मध्ये तपासणी कण्यात आली. या दोन्ही रिपोर्ट्समध्ये महिलेला कॅन्सर नव्हताच असे समोर आले आहे.

या सर्व प्रकारानंतर महिलेनं निषकाळजीपणाचा आरोप लावत आरोग्य मंत्र्याकडे तक्रार केली आहे. रूग्णालयात चुकीचा उपचार झाल्यामुळे गंभीर साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागला. आरोग्य मंत्र्यांनी कोट्टयम सरकारी रूग्णालयाच्या प्राचार्यांना या प्रकारणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:39 pm

Web Title: kerala woman gets chemotherapy after wrong cancer diagnosis loses hair income
Next Stories
1 या पाच कारणांमुळे महिला टाळतात ‘ब्रेकअप’
2 World No-Tobacco Day : धूम्रपान सोडण्यासाठी करा हे उपाय..
3 व्यसन नव्हे औषध म्हणून तंबाखूचा वापर
Just Now!
X