04 March 2021

News Flash

पत्नीचे १४ प्रियकरांसोबत संबंध, पतीने नोटीस पाठवून मागितले १०० कोटी

धक्कादायक घटना

संग्रहित छायाचित्र

एका व्यक्तीने पत्नीच्या १४ प्रियकरांना नोटीस पाठवून तब्बल १०० कोटींची मागणी केल्याची घटना कोलकातामध्ये घडली आहे. कोलकाता येथील एका व्यावसायिकाला आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय आला. पत्नीचा पाठलाग केल्यानंतर त्याला विवाहबाह्य संबंध असल्याचं दिसून आलं. पण समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं. पत्नीचे एक, दोन नव्हे तब्बल १४ प्रियकर असल्याचं पतीला समजलं. सुरुवातीला पतीच्या पायाखालील जमीनच सरकली. पण त्यानंतर त्या व्यावसायिकानं जे केलं त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पत्नीचे १४ प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे पतीला समजले. त्यानंतर पतीने सर्व प्रियकराला नोटीस पाठवली असून १४ जणांकडे १०० कोटी रुपयांची नुकसानभरवाईची मागणी केली आहे. कारण त्या १४ जणांमुळे त्याचं वैवाहिक आयुष्य विस्कळीत झालं आहे.

नोटीसमध्ये व्यावसायिकानं म्हटलेय की, नोटीस मिळाल्यानंतर दोन आठवड्यात मला १०० कोटी रुपये द्यावे. जर रक्कम मला मिळाली नाही तर कायदेशीर कारवाई करेल. मला समजलेय की माझ्या पत्नीबरोबर तुमचे शारिरीक संबंध आहेत. तुमच्यामुळे माझं वैवाहिक आयुष्य खराब झालं असून समाजातही माझी प्रतिमा धुळीस मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:35 pm

Web Title: kolkatta man 14 lovers of wife 100 crore sending notices nck 90
Next Stories
1 Video : ही आहे Floating Branch… पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी SBI ने थेट बोटींमध्ये उभारल्या शाखा
2 “इतना बड़ा कांड करूंगा की…”; ‘विकास दुबे’ने पोलिसांना दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
3 Video : …म्हणून त्याने घेतली गाढवाची मुलाखत; कारण समजल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही होतंय कौतुक
Just Now!
X