28 February 2021

News Flash

IPL मध्ये अपयशी ठरलेला मॅक्सवेल ऑस्ट्रेलियात चमकला, वासिम जाफर म्हणतो…गुन्हा है ये !

भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मॅक्सवेलची नाबाद ६३ धावांची खेळी

भारतीय संघाचा माजी कसोटीपटू वासिम जाफर सध्या सोशल मीडियावर आपली एक नवीन ओळख बनवतो आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या जाफरने ट्विटरवरुन क्रिकेटशी संबंधित घटनांवर मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

आतापर्यंत जाफरने अनेक घटनांवर मिम्स शेअर करत आपल्यातला गमतीशीर अंदाज सर्वांना दाखवला आहे. IPL मध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व करणारा मॅक्सवेल संपूर्ण हंगामात अपयशी ठरला होता. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर मॅक्सवेलने सलग दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. मॅक्सवेलच्या या खेळीवर जाफरने भन्नाट मिम शेअर केलं आहे. पाहा, काय म्हणतोय जाफर…

ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने नाबाद ६३ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 4:18 pm

Web Title: kxip batting coach wasim jaffer posts another hilarious bollywood meme this time for glenn maxwell psd 91
Next Stories
1 कांगारुंविरुद्ध कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-रोहितच्या पंगतीत मानाचं स्थान
2 Video : क्रिकेटच्या मैदानावर प्रेमाला बहर, भारतीय चाहत्याची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी
3 Video : भगव्या झेंड्याने वाढवली सिडनीची शान, ऑस्ट्रेलियात छत्रपतींचा जयघोष
Just Now!
X