20 September 2018

News Flash

वयाच्या विसाव्या वर्षी झाली अब्जाधीश, मार्क झकरबर्गलाही टाकलं मागे

केली जेनर ही किम कार्दाशिअन हिची सावत्र बहिण आहे. केलीची सध्याची संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे.

'केली कॉस्मेटिक्स' या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती साम्राज्ञी आहे.

मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअन हिची सावत्र बहिण असलेली केली जेनर ही वयाच्या विसाव्या वर्षी अब्जाधीश झाली आहे. तिनं फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत मार्क हा सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता.

HOT DEALS
  • Apple iPhone 7 Plus 128 GB Rose Gold
    ₹ 61000 MRP ₹ 76200 -20%
    ₹6500 Cashback
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%

‘केली कॉस्मेटिक्स’ या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती सम्राज्ञी आहे. ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठीची सौंदर्यप्रसाधनं ही कंपनी तयार करते. विशेष म्हणजे केली स्वत: तिच्या ओठांसाठी प्रसिद्ध आहे. केलीची सध्याची संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात असल्याचं ‘फोर्ब्स’ मासिकानं म्हटलं आहे. तर ‘केली कॉस्मेटिक्स’ कंपनीचं एकूण बाजारमूल्य हे ५४ अब्जांच्या आसपास आहे.

दोन वर्षांपूर्वी केलीनं ही कंपनी सुरू केली होती. अर्थात किमची बहिण असल्यानं ती प्रसिद्ध होतीच मात्र या कंपनीनं तिला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. ‘फोर्ब्स’नं नुकतीच अमेरिकेतील ‘self-made US billionaire’ची यादी जाहीर केली. यात केली १९ व्या स्थानावर आहे. पुढील काही वर्षांत तिच्या संपत्तीत आणखी वाढ होणार आहेत. याआधी मार्क झकरबर्ग वयाच्या २३ व्या वर्षी अब्जाधीश झाला होता. त्यामुळे त्याचा विक्रम केलीनं मोडला. मात्र ती self-made US billionaire’ असूच शकत नाही, तिचा जन्म गर्भश्रीमंत घरात झालाय तेव्हा तिला या स्थानी पोहोचायला इतरांच्या तुलनेत फार मेहनत घ्यावी लागली नाही अशा शब्दात तिच्यावर टीका करण्यात आली आहे.

First Published on July 12, 2018 2:01 pm

Web Title: kylie jenner to beat zuckerberg as youngest billionaire