युनायटेड किंग्डममधील न्यायालयाने एका प्रकरणामध्ये आरोपीला एक विचित्र अट घातली आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या या व्यक्तीला महिलांपासून दूर ठेवण्याठी न्यायालयाने एक विचित्र अट या व्यक्तीला घातली आहे. या व्यक्तीला कोणत्याही महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्याच्या २४ तास आधी त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना द्यावी लागेल. डीन डेअर असं या अरोपीचं नाव असून तो ३९ वर्षांचा आहे. डीनने अनकेदा लैंगिक उत्तेजनातून महिलांवर हल्ले केलेत. यामध्ये त्याने अगदी १४ वर्षीय मुलीचाही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे. तसेच डीनने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची छेड काढण्याची धमकी दिल्याचंही न्यायालयासमोर सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> सेक्स करताना झाला त्याचा मृत्यू; शवविच्छेदनामधून समोर आली धक्कादायक माहिती

supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

पश्चिम लंडनमधील नॉटींग हिल्स येथे राहणारा डीन हा इमारतींचे बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे. डीनने आतापर्यंत अनेक महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच आता न्यायालयाने त्याच्यावर अनेक निर्बंध लादले आहे. दैनंदिन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच महिलांशी डीनने संवाद साधावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.

बस कंडक्टर, दुकानदार किंवा टॅक्सी चालक महिला असेल तर तिच्याशी डीनने कामापुरतं बोलावं असं वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं द मेट्रोने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच डीनला सेक्स करण्याची इच्छा झाल्यास त्याने आपल्या महिला जोडीदाराला आणि चारिंग क्रॉस पोलीस स्थानकामध्ये यासंदर्भात २४ तासआधी कळवणं बंधनकारक असणार आहे असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> PPE सूट फाडून नर्सने करोना रुग्णासोबत केला सेक्स

डॅन याच्याविरोधात सात वेगवेगळ्या महिलांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयामध्येही सुनावणी सुरु असताना डॅन अगदीच विचित्र पद्धतीने वागत होता. तो न्यायालयामध्येच मोठ्याने जांभई देणे आणि आवाज काढणे यासारखे प्रकार करत होता. न्यायालयाने डॅनला दोषी ठरवलं असून त्याने महिलांची छेड काढल्याचं न्यायालयाने मान्य केलं असलं तरी त्याच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने त्याला कठोर शिक्षा करण्यात आलेली नाही.

नक्की वाचा >> पोलिसांनी छापा मारला तेव्हा घरात ५० जण करत होते  Sex Party

न्यायालयाने डॅनविरोधात सेक्शुअल रिस्क ऑर्डर जारी केली आहे. म्हणजेच एखाद्या लैंगिक अत्याचार किंवा छेडछाडीच्या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाले नाही तरी अशा व्यक्तींकडून पुन्हा असे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नक्की वाचा >> पोप फ्रान्सिस म्हणतात, “चांगलं खाणं आणि सेक्स…”