04 March 2021

News Flash

Video : चालत्या विमानातून उतरुन पायलटने पूर्ण केले किकी चॅलेंज

एका महिला पायलटनी चक्क चालू विमानाच्या कॉकपीटमधून उतरुन हे चॅलेंज पूर्ण केले. तिचा अशाप्रकारे विमानातून उतरुन डान्स केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला

जगभरात सध्या किकी चॅलेंजने धुमाकूळ घातल्यानंतर आता त्याचा पुढचा टप्पा सुरु झाल्याचे समोर आले आहे. अनेकांचा या चॅलेंजमुळे जीव गेल्यानंतर आता त्याची पुढची पायरी समोर आली आहे. चालत्या गाडीतून उतरुन डान्स करण्याचे हे चॅलेंज आता विमानातून उतरण्यापर्यंत गेले आहे. एका महिला पायलटनी चक्क चालू विमानाच्या कॉकपीटमधून उतरुन हे चॅलेंज पूर्ण केले. तिचा अशाप्रकारे विमानातून उतरुन डान्स केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये तिच्यासोबत विमानातील एक कर्मचारीही असल्याचे दिसत आहे.

या पायलटचे नाव एलेजेंड्रा असून कॉकपीटमधीन उठून ती खाली उतरली आणि कीकी चॅलेंजच्या किकी डू यू लव्ह मी या गाण्यावर डान्स करायला लागली. धोक्याचे म्हणजे या दोघी असा डान्स करत असताना विमान विमानतळावर पुढे पुढे जात असल्याचेही व्हिडियोमध्ये दिसत आहे. नेटीझन्सनी हा व्हिडियो अनेक वेळा पाहिला असून शेअरही केला आहे. हा व्हिडियो नेमका कोणत्या देशातील कोणत्या विमानतळावरील आहे हे मात्र समजू शकले नाही. कॉमेडियन शिगी याने या चॅलेंजची सुरुवात केली असून त्याचे लोण कमी कालावधीत खूप पसरले.

Next Stories
1 पांडाने काढलेल्या चित्राची किंमत हजारोंच्या घरात
2 Poladpur Accident : आंबेनळी घाटात बस चालक कोण? व्हिडिओ व्हायरल
3 Ind vs Eng : ३९ व्या कसोटीत विराट कोहलीने मोडली परंपरा
Just Now!
X