News Flash

कौतुकास्पद: लक्ष्मी, भोपाळमधली महिला हमाल; पतीच्या निधनानंतर स्वीकारली त्याची नोकरी

पुरुषी काम असल्याचा शिक्का या कामावर पडला असल्याने तसेच हा रुढीवाद सोडून ती काम करीत असल्याने अनेकांना तीचे कौतुकही वाटते.

संग्रहित छायाचित्र

भोपाळ रेल्वे स्टेशनवर एक ३० वर्षीय महिला प्रवाशांच्या गर्दीतून नेहमी मार्ग काढताना दिसते. या महिलेने अंगात लाल रंगाचा रेल्वे हमालाचा गणवेश परिधान केलेला असतो. कुली नंबर १३ असणारी ही महिला हमाल आपल्या पतीच्या निधनानंतर त्याचा गणवेश आणि क्रमांकासह हे काम करीत आहे.

रेल्वे गाड्यांमधून प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या प्रवाशांना त्यांच्या बॅगा उचलण्यास मदत करण्यासाठी लक्ष्मी सदैव तयार असते. ती एका ८ वर्षांच्या मुलाची आई आहे. तिच्या पतीचे याच वर्षी जुलै महिन्यांत निधन झाले. त्यानंतर जगण्याच्या संघर्षाशी दोन हात करताना आपल्या मुलाला चांगले जीवन जगता यावे यासाठी तिने आपल्या पतीचाच हमालीचा व्यवसाय स्विकारला.

लक्ष्मी सांगते, “आपल्याला जगण्यासाठी या कामाशिवाय दुसरा पर्याय नव्हता, माझ्या मुलासाठी मला काम करणे भाग होते. त्यामुळे हे काम स्विकारले. या कामातून मला दररोज ५० ते १०० रुपयांची मिळकत होते. शारिरिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी या कामाला मागणी आहे, मात्र, माझे शिक्षण झालेले नसल्याने हे काम करण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता. लक्ष्मीच्या पतीआधी तिचे सासू-सासऱ्यांचेही निधन झाल्याने ती आपल्या मुलासह स्वतःच्या आई-वडिलांच्या घरी राहते.

या कामामध्ये चांगले पैसे मिळत नाहीत तसेच अनेकदा तर तुमची काहीच कमाई होत नाही. मात्र, सहकारी हमाल प्रवाशांचे जड सामान उचलण्यास आपल्याला या कामात मदत करतात, असेही तिने या कामातील आव्हानांवर बोलताना सांगितले.

भोपाळ रेल्वेस्टेशनवरील या महिला हमालाला पाहूण बऱ्याचदा प्रवाशांना आश्चर्य वाटते. कारण, पुरुषी काम असल्याचा शिक्का या कामावर पडला असल्याने तसेच हा रुढीवाद सोडून ती काम करीत असल्याने अनेकांना तीचे कौतुकही वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 3:53 pm

Web Title: lakshmi a female hamal in bhopal after her husbands death she accepted his job aau 85
Next Stories
1 भारतातील पहिल्या पाद स्पर्धेत कुणी मारली बाजी…?
2 #HowdyModi: ट्रम्प, मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गाणारा ‘स्पर्श’ आहे तरी कोण?
3 अंडरवॉटर प्रपोज करण्याच्या नादात प्रियकराने गमावला जीव
Just Now!
X