News Flash

हिमाचल प्रदेश दरड दुर्घटना : प्रसिद्ध महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला तो फोटो, कॅप्शन आहे, “Life is nothing without…”

किनौर जिल्ह्यातील बटसेरीजवळ सांगला-चितकूल मार्गावरील या दुर्घटनेमध्ये ९ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये दिपा यांच्यासोबतच नागपूरमधील एका डॉक्टराचाही समावेश

DR Deepa Sharma
दुर्घटनेच्या काही तास आधीच पोस्ट केला होता फोटो (फोटो ट्विटरवरुन साभार)

हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यात रविवारी दरडी कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले. मोठमोठ्या शिळा कोसळून नदीवरील पूलही तुटला आहे. किनौर जिल्ह्यातील बटसेरीजवळ सांगला-चितकूल मार्गावर या दरड दुर्घटना घडल्या. त्यापैकी एका दुर्घटनेत ११ पर्यटकांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर या मिनी बसवर एक भली मोठी शिळा कोसळल्याने नऊ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत पर्यटक दिल्ली आणि चंडीगड येथून हिमाचलमध्ये सहलीला आले होते, असेही पोलिसांनी सांगितले. अशीच आणखी एक दरड दुर्घटना किनौर जिल्ह्यात घडली असून तीत एक जण जखमी झाला आहे. मरण पावलेल्या पर्यटकांमध्ये डॉ. दिपा शर्मा यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. दिपा यांचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिपा यांनी दोनच दिवसापूर्वी या ट्रीपदरम्यान काढलेला आणि आयुष्याबद्दल भाष्य करणारा फोटोही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.

दिपा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. २४ जुलैच्या पोस्टमध्ये दिपा एका झऱ्याजवळ उभ्या असल्याचे फोटो दिसत आहेत. हात पसरवून पोज देणाऱ्या आपल्या या फोटोंना दिपा यांनी, “निर्सगाच्या सानिध्याशिवाय आयुष्य काहीच नाहीय,” असं म्हटलं होतं.

याशिवाय दिपा यांनी अपघाताच्या काही तास आधी म्हणजेच रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आणखीन एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये त्या भारत आणि चीनच्या सीमेजवळ सामान्य भारतीयांना जिथपर्यंत जाऊ दिलं जातं तिथे उभ्या आहेत. “भारताच्या शेवटच्या टोकावर उभी आहे जिथपर्यंत सामान्यांना जाऊ दिलं जातं. यानंतर ८० किमी पुढे तिबेटची सीमा आहे, ज्यावर चीनने बेकायदेशीररित्या ताबा मिळवलाय,” असं दिपा कॅप्शनमध्ये म्हणाल्यात.

दिपा यांच्या अशा आकस्मिक मृत्यूचा अनेकांना धक्का बसला असून त्यासंदर्भात अनेकांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.

१)

२)

३)

४)

५)

६)

कोण होत्या दिपा शर्मा?

दिपा शर्मा यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला होता. त्या मूळच्या राजस्थानमधील जयपूर येथील होत्या. समाजकार्य आणि गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी त्या ओळखल्या जायच्या. तसेच पर्यावरणाविषयी त्यांना विशेष प्रेम होतं. करोना कालावधीमध्ये त्यांनी अनेक रुग्णांना मदत केल्याचं त्यांच्या मृत्यूची बातमीसमोर आल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन सांगितलं आहे. दिपा या ३४ वर्षांच्या होत्या.

गावांचा संपर्क तुटला

दरडी कोसळल्यानंतर मोठमोठ्या शिळा प्रचंड वेगाने रस्ता आणि नदीमध्ये कोसळल्या. एक शिळा बास्पा नदीच्या पुलावर कोसळल्याने पूल तुटला असून गावाचा संपर्क तुटला आहे. मदत  पथकांनी ढिगारे उपसण्याचे काम सुरू केले आहे; परंतु दरडी कोसळलेल्या भागातून सतत मोठमोठ्या शिळा कोसळत असल्याने त्यात अडथळे येत. आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

मृतांमध्ये नागपूरच्या एकाचा समावेश

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीचा पत्ता असलेल्या  प्रतीक्षा पाटील (२७) यांचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूर सोडले, पण आधारकार्डावर येथील पत्ता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 7:40 am

Web Title: landslide in himachal pradesh dr deepa sharma died scsg 91
टॅग : India News
Next Stories
1 ‘टोक्यो ऑलिम्पिकसाठी २०२१’ हा हॅशटॅग वापरत आलिया भट्टने शेअर केला ‘हा’ फोटो!
2 सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आलेला ‘इंदूरचा फायर डोसा’ आहे तरी कसा?
3 आयुष्यभर मोफत पिझ्झा; रौप्यपदक विजेत्या मिराबाई यांच्यासाठी डॉमिनोज इंडियाची मोठी घोषणा
Just Now!
X