करोनाच्या संकटामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाउन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता साऱ्यांनाच घरी बसावं लागलंय. पण गेल्या काही दिवसांपासून घरी बसायचा कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवं काहीतरी… नवं शिकण्यासारखं… तेही अगदी सोप्या भाषेत अन् प्रात्यक्षिकासह…

चित्रपतंग नावाचा एक कलावंतांचा ट्रस्ट आहे. त्यांनी घरात अडकून पडलेल्या मुलांसाठी काही व्हिडिओ तयार केले आहेत. डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून आम्हीही (लोकसत्ता डॉट कॉम) चित्रपतंगशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ तुम्हाला लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर पाहायला मिळणार आहेत.. रोज एक याप्रमाणे नवं काहीतरी शिकण्याची ओढ असेल तर नक्की बघा…

हा आहे आजचा व्हिडिओ…

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला… आम्हाला युट्यूबवरील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..
आणि हो… पुढचा भाग उद्याच असेलच.