करोना महामारीच्या काळात आपल्या वावरण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. यातूनच प्रेरणा घेत एका महिला ड्रेस डिझायनरने ‘फिजिकल डिस्टसिंग ड्रेस’ तयार केला आहे. शाय नामक डिझायनरने हा ड्रेस तयार केला असून आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्यांनी याचे फोटो शेअर केले आहेत. हा ड्रेस परिधान केल्यास संबंधित महिलेला करोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने फिजिकल डिस्टंसिंगची चिंता करण्याची गरज पडणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ♡ Shay ♡ (@crescentshay)

शाय आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाल्या, “हा ड्रेस म्हणजे एक छोटासा सोशल डिस्टंसिंगचा फुगाच आहे. या ड्रेसच्या निर्मितीसाठी तिला अनेक गणिती समिकरणं मांडावी लागली. यामध्ये ती दोनदा अपयशी ठरली मात्र तिने प्रयत्न सोडले नाहीत. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली आणि विशेष अशा ‘फिजिकल डिस्टंसिंग ड्रेस’ची निर्मिती झाली.”

या ड्रेसची निर्मिती करताना शॉय यांनी टूल नेटिंग वापरण्याचं ठरवलं. यातून त्यांनी १२ फुटांचा हूपस्कर्ट ड्रेस साकारला. हा ड्रेस अत्यंत कमी वजनाचा आणि स्वस्त आहे. हा स्कर्ट बनवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर धाग्यांची आवश्यकता भासली. सुरुवातीला त्यांनी हूपस्कर्ट तयार केला त्यानंतर त्यावर टूल ओव्हरस्कर्ट शिवला. हा संपूर्ण ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांनी त्यावर मॅचिंग म्हणून फेस मास्कही बनवला, त्यामुळे या संपूर्ण ड्रेसचा लूक पूर्ण झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ♡ Shay ♡ (@crescentshay)

शाय यांनी आपल्या या कोविड स्पेशल ड्रेसचे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा ड्रेस जोडताना त्यांना तो घराबाहेर राहून जोडावा लागला कारण त्यांच्या घरातही तो जोडणे शक्य नव्हते. एकट्या व्यक्तीला हा प्रचंड मोठा ड्रेस सांभाळता येणे कठीण असल्याने त्याला शाय यांनी चाकंही लावली आहेत.

शाय यांना या ड्रेससाठी ३०० यार्ड (२७० मिटर्स) पेक्षाही जास्त कापडाची गरज पडली. या ड्रेसची त्रिज्या ही सहा फूट इतकी आहे. जे अंतर फिजिकल डिस्टंसिंग पाळण्यासाठी आदर्श समजले जाते. हा ड्रेस तयार करण्यासाठी त्यांना २ महिन्यांचा कालावधी लागला. शाय यांना हा ड्रेस परिधान करुन पार्किंगमध्ये फोटोशूट करावं लागलं. कारण केवळ हीच जागा यासाठी योग्य होती.

नेटिझन्सलाही आवडली फिजिकल डिस्टंसिंग ड्रेसची कल्पना

नेटिझन्सलाही शाय यांची ही फिजिकल डिस्टंसिंग ड्रेसची कल्पना आवडल्याचे दिसते. कारण एका युजरने शाय यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अमेझिंग असं म्हटलं आहे. तर इतर अनेकांनीही आपल्याला हा ड्रेस आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.