News Flash

Viral Video : पूजाचा ‘ढिंच्याक’ व्हिडिओ पाहा… पण तुमच्या जबाबदारीवर!

सेल्फी घेणं विसराल

Viral Video : पूजाचा ‘ढिंच्याक’ व्हिडिओ पाहा… पण तुमच्या जबाबदारीवर!
(छाया सौजन्य : Dhinchak Pooja/YouTube)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कोणाला काय आवडेल सांगत येत नाही, आता ही ‘ढिंच्याक पूजा’च बघा ना राव! काय गाते ही मुलगी, आवाज तर तिचा विचारायलाच नको. तिने एकदा गायला सुरुवात केली की बस रे बस. आता तुम्हाला वाटत असेल हिच्या सुरेल आवाजाचं कौतुक वगैरे चाललय… तर हा तुमचा गैरसमज वेळीच दूर केलेला बरा! तर ही ढिंच्याक पूजा तिच्या ‘सुरेल?’ ‘आवाजा’साठी सोशल मीडियावर जास्तच प्रसिद्ध आहे.

यावेळीही पूजाने एक ‘ढिंच्याक’ गाणं तयार केलं आहे. आता हे गाणं ढिंच्याकच आहे हा तिचा तरी समज आहे बुवा, बाकींच्याचं आपल्याला काही माहिती नाही. असो तर मुद्दा असा की पूजाने आपलं हटके गाणं आणलंय. या गाण्याचं नाव आहे ‘सेल्फी मैने लेनी आज’. आपल्या डोक्यावर सेल्फीचं वेडं एवढं आहे की सेल्फी घेण्यासाठी आपण काय काय ‘अग्नीदिव्य’ पार पाडतो हे तिने गाऊन दाखवलं. आता तुम्हालाही वाटतं असेल की ढिंच्याक पूजाचं गाणं लय भारी वगैरे असेल तर एकदा ते ऐकून पाहाच. हो पण तुमच्या स्वत:च्या जबाबदारीवर!

काय मग ऐकलंत की नाही पूजाचं ‘सेल्फी मैने लेनी आज’ गाणं. आता हे गाणं संपता संपता आयुष्यात पुन्हा कधी ढिंच्याक पूजाचं गाणं ऐकणार नाही अशा शपथा वगैरे तुम्ही घेतल्या असतील तर अजिबात नवल वाटायला नको. आता अशा प्रतिक्रिया देणारे सोशल मीडियावरचे तुम्ही काही पहिले नाहीत हे नक्की सोशल मीडियावर तर ‘#Dhinchakpooja’ हा हॅशटॅग वापरून नेटिझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात आता तुम्हीच बघा काय निरोप पाठवलेत ढिंच्याक पूजाला ते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 11:22 am

Web Title: listen dhinchak pooja hilarious song selfie maine le li aaj
Next Stories
1 Viral Video : ‘त्या’ बकरीला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी
2 Viral Video : फक्त एका फोटोसाठी त्याने नववधूच्या कपड्यांना आग लावली
3 Viral Video : चुकीच्या जागी स्पर्श केल्यामुळे महिलेने त्याला दिले रट्टे
Just Now!
X