News Flash

दमलेल्या आईची काळजी घेणाऱ्या मुलाचा हृद्यस्पर्शी फोटो व्हायरल

आई आपल्यासाठी किती राबत असते ना!

(छाया सौजन्य : ChinaGlobalTvNetwork/Facebook)

आई आपल्यासाठी किती राबत असते ना! आपल्यासाठी तिने घेतलेल्या कष्टाचे मोल आपण कधीही चुकवू शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातल्या प्रत्येकांसाठी काही ना काही करण्यात तिचा वेळ जातो. ही सगळी काम करताना एका क्षणाचीही उसंत तिला मिळत नाही. तरीही कधीही तक्रार न करता ती आपलं काम करत असते, तिची ही मेहनत, तिचे कष्ट, तिची धावपळ आपल्याला कधी लक्षातही येत नाही. पण कधीतरी एखादी गोष्ट अशी घडते की जी आपल्याला आपली चूक लक्षात आणून देते. असाच काहीसा एक फोटो आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं म्हणतात की ज्या गोष्टी कधी कधी शब्दात मांडता येत नाहीत त्या गोष्टी अधिक प्रभावीपणे एखादं छायाचित्र सांगू शकतं आणि हा फोटो देखील नेमकं तेच सांगतो.

दिवसभर कष्ट करून थकलेली आई रेल्वेच्या आसनावर डोक ठेवून गाढ झोपलीय आणि तिचं छोटं मुल तिच्या बाजूला उभं राहून तिची काळजी घेत आहे. एका हाताने त्याने आपल्या आईचे डोकं धरून ठेवलं आहे तर दुसऱ्या हातात आईला त्रास होऊ नये म्हणून तिची पर्स आणि तिच्या जवळचं सामान देखील सांभाळत तो उभा शांतपणे उभा आहे. एवढ्याशा वयातही या मुलाला किती समज आहे. तेव्हा आई आणि मुलामधलं नातं किती घट्ट असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा फोटो आहे. चीनमधला हा फोटो असून सुरूवातीला चीनच्या सोशल मीडिया विबोवर तो व्हायरल झाला होता. काही फोटोंना खरं तर शब्दांची गरज नसते, हे फोटो इतके ताकदवान असतात की ते खूप काही सांगून जातात. आई मुलांमधल्या प्रेमाचं नातं तितक्याच ताकदीने या फोटोत मांडलं आहे. म्हणून प्रत्येकांच्या मनाला भिडलेल्या या फोटोंवर आतापर्यंत हजारोंनी कमेंट येत आहेत तर दहा हजारांहूनही अधिक लोकांनी तो शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 10:24 am

Web Title: little boy taking care of his mother picture went viral on social media
Next Stories
1 Viral Video : लाट आली धावून अन् रिपोर्टर गेला वाहून
2 मल्लखांब दिन स्पेशल : ‘मल्लखांब’पट्टूंचे गाव…!
3 आता रेल्वेत मिळणार डॉमिनोजचा पिझ्झा आणि मॅक्डीचा बर्गर
Just Now!
X