18 November 2019

News Flash

प्रत्येक राज्याच्या नावामागे दडलीये एक कहाणी

जाणून घ्या नावामागची आगळीवेगळी गोष्ट

एखाद्या वस्तूचे किंवा ठिकाणाचे नाव विशिष्ट का असते यामागे काही ना काही लॉजिक असते. ते नाव ठेवण्यामागे काहीतरी कारण किंवा एखादी कथाही असते. एखादा प्रदेश, भाग हा विशिष्ट नावानेच का ओळखला जातो, त्यामागे काय कारण असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आता आपल्या देशात असणाऱ्या अनेक राज्यांची नावे नेमकी कशी पडली असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर त्याची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही नावे अर्थपूर्ण असून प्रत्ये नावामागे काही ना काही अर्थ आहेच. पाहूयात राज्यांच्या नावाविषयीच्या रंजक गोष्टी…

१. मध्य प्रदेश : मध्यप्रदेश राज्य, ह्या राज्याच्या नावामागे अगदी सोपे लॉजिक आहे. हे क्षेत्र भारताच्या मध्यभागी आहे म्हणून ह्याला मध्यप्रदेश हे नाव देण्यात आले.

२. छत्तीसगड : छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेशातून विभक्त होऊन तयार झाले आहे. येथील ३६ ऐतिहासिक किल्ल्यांमुळे ह्या क्षेत्राला छत्तीसगड हे नाव पडले.

३. झारखंड : संस्कृत भाषेत ‘झार’ ह्याचा अर्थ ‘जंगल’ असा होतो तर ‘खंड’ म्हणजे जमीन. ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत म्हणून ह्या क्षेत्राला झारखंड असे नाव देण्यात आले.

४. उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या उत्तर भागात आहे, त्यामुळे ह्या क्षेत्राला उत्तरप्रदेश असे नाव देण्यात आले.

५. उत्तराखंड : २००० साली उत्तर प्रदेशातून विभक्त होऊन उत्तराखंड ह्या राज्याची निर्मिती करण्यात आली. उत्तराखंड ह्याचा अर्थ ‘उत्तरेकडील जमीन’ असा होतो.

६. गोवा : गोव्याचं नाव हे संस्कृत शब्द ‘गौ’ म्हणजेच गाय ह्यावरून पडले असल्याचे काही लोक मानतात. तर काही लोक असे मानतात की, हे नाव युरोपीय किंवा पोर्तुगाली भाषेतून आले आहे.

७. महाराष्ट्र : १ मे १९६० साली महाराष्ट्र ह्या राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हे नाव दोन संस्कृत शब्दांची जोड आहे. ज्यात ‘महा’ म्हणजे महान म्हणजेच ‘महान राष्ट्र’.

८. कर्नाटक : कर्नाटक हा शब्द संस्कृत मधील ‘कारू’ आणि ‘नाद’ ह्या दोन शब्दांची जोड आहे. ज्याचा अर्थ ‘उन्नत भूमी’ असा आहे.

९. हिमाचल प्रदेश : संस्कृतमध्ये ‘हिम’ ह्या शब्दाचा अर्थ ‘बर्फ’ तर ‘अचल’ ह्या शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. ह्या दोन शब्दांना मिळून ‘हिमाचल’ हा शब्द बनला आहे.

१०. हरियाणा : ‘हरियाणा’ हा शब्द ‘हरि’ आणि ‘आना’ ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. ह्यात ‘हरि’ म्हणजेच विष्णू भगवान आणि ‘आना’ म्हणजे ‘आगमन’. असं म्हणतात की महाभारता दरम्यान भगवान विष्णू येथे आले होते म्हणून ह्या क्षेत्राचं नाव हे हरियाणा असे पडले.

११. गुजरात : अठराव्या शतकात गुजरा यांनी याठिराणी राज्य केले होते, म्हणून याचे नाव गुजरात पडले.

१२. पंजाब : पंजाब ह्या शब्दाचा अर्थ ‘पाच नद्यांची जमीन’ असा होतो. हा शब्द इंडो-इरानी शब्द पुंज म्हणजेच ‘पाच’ आणि ‘आब’ म्हणजेच पाणी ह्यांच्या एकत्रीकरणातून बनला आहे.

१३. पश्चिम बंगाल : बंगाल हा शब्द संस्कृतमधील ‘वंगा’ ह्या शब्दापासून बनला आहे. ह्यालाच पुढे जाऊन फारसी भाषेत ‘बंगालह’ आणि हिंदीत ‘बंगाल’ तर बंगाली भाषेत ‘बांग्ला’ असे म्हटले जाऊ लागले.

१४. अरुणाचल प्रदेश : संस्कृतमध्ये ‘अरुणा’ म्हणजे ‘सकाळची किरणे’ आणि ‘अचल’ म्हणजे ‘पर्वत’ असा अर्थ आहे. ह्या दोघांन मिळूनच ‘अरुणाचल प्रदेश’च नाव पडलं आहे.

१५. मेघालय : संस्कृतमध्ये ‘मेघ’ म्हणजे ‘ढग’ आणि ‘आलय’ म्हणजे ‘आवास’, ह्या दोघांना मिळून ‘मेघालय’ असं नाव पडलं आहे.

१६. त्रिपुरा : एका कथेनुसार ह्या राज्याचे नाव येथील ‘त्रिपुर राजा’ ह्यांच्या नावावरून पडलं आहे. हे भारतातील तिसरं सर्वात छोटं राज्य आहे.

१७. आंध्र प्रदेश : संस्कृत भाषेत ‘आंध्र’ म्हणजे ‘दक्षिण’, ह्यामुळेच दक्षिणेकडे असणारा प्रदेश म्हणून या क्षेत्राचं नाव हे आंध्र प्रदेश असं पडलं.

First Published on May 25, 2018 1:04 pm

Web Title: logic behind state name in india