News Flash

‘घरीच राहा, सुरक्षित राहा!’ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद…; उद्यापासून जाहीर होणार टॉप १०० जणांची नावे

स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला

लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘घरीच राहा, सरक्षित राहा’ (stay home stay safe)  या चिमुकल्यांसाठीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. लॉकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या छोट्याशा डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आल्या आहेत. या स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला. आता त्यापैकी टॉप १०० मध्ये कोणाची निवड झाली आहे, याची उत्सुकता वाढली आहे. या स्पर्धेचा निकाल आता जाहीर करण्यात येणार आहे.

आलेल्या स्पर्धकांमधून १०० जणांची निवड ही डिजिटल प्रमाणपत्रासाठी करण्यात येणार होती. त्यानुसार या शंभर जणांपैकी २५ जणांची यादी उद्या (बुधवारी) जाहीर करण्यात येणार आहे. या २५ जणांनी साकारलेल्या कलाकृती आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://www.loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

त्यानंतर गुरूवारी २५ जणांची नावं जाहीर होतील. शुक्रवारी आणि शनिवारी आणखी २५-२५ जणांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांच्या कलाकृतीही त्या-त्या दिवशी आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://www.loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

त्यानंतर रविवारी या शंभर जणांपैकी पहिल्या पाच जणांची (Top 5) यादी जाहीर करण्यात येईल. त्यासाठी https://www.loksatta.com आणि लोकसत्ताच्या फेसबुक पेजला (Loksattalive) भेट द्यायला विसरू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 5:59 pm

Web Title: loksatta dot com and unicef organised competition for kids stay home stay safe results will be announced soon
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दहशत ‘लॉकडाउन चार’ची आणि आठ वाजण्याची; पाहा व्हायरल झालेले Memes
2 ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V19 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3 Tata Sky Binge+ च्या किंमतीत घसघशीत कपात, नवीन ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर्स
Just Now!
X