नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव देण्यात यावं यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राचा पाठवण्याची तयारी सुरु केली असतानाच. दुसरीकडे स्थानिकांनी मात्र रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी केलीय.

नक्की वाचा >> जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार आणि कवी प्रीतीश नंदी यांनी भारतात हवाई प्रवासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जेआरडी टाटा यांचं नाव या विमानतळाला देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यातच समोवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत हे नवं विमानतळ म्हणजे आताच्या विमानतळाचं एक्सटेन्शन असून त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळच राहील असं म्हटलं आहे. त्यामुळेच आता या विमानतळाचा नक्की कोणाचं नाव द्यायचं यासंदर्भात वेगवेगळ्या पक्षांकडून आणि लोकांकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसत्ता डॉट कॉमने या विमानतळाला कोणाचं नाव द्यावं यासंदर्भातील वाचकांची मत जाणून घेण्यासाठी ट्विटरवरुन जनमत चाचणी घेतली.

नक्की वाचा >> भाजपाची आंदोलनाला फूस ते शिवसेनेला थेट आव्हान… नवी मुंबई विमानतळ वादावर राज ठाकरेंनी मांडलेले १० मुद्दे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नावं देण्यात यावं?, असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नासोबत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या चार नावांचा पर्याय देण्यात आलेला. त्यापैकी पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं नाव होतं दि. बा. पाटील. तर तिसरा पर्याय म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि चौथा पर्याय जे. आर. डी. टाटा यांच्या नावाचा देण्यात आलेला.

ट्विटरवर या जनमत चाचणीमध्ये ४ हजार २६६ जणांनी आपलं मत नोंदवलं. त्यापैकी ४३.१ टक्के वाचकांनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव योग्य राहील असं मत नोंदवलं. तर त्या खालोखाल दि. बा. पाटील यांच्या नावाला सर्वाधिक पसंती वाचकांनी दिल्याचं पहायला मिळालं. दि. बा. पाटील हा पर्याय २४.८ टक्के वाचकांनी निवडला. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असं मत व्यक्त करण्यांची संख्या १०.७ टक्के इतकी होती. तर या यादीमधील शेवटचा पर्याय असणाऱ्या जे. आर. डी. टाटा यांचं नाव विमानतळाला देण्यासंदर्भात मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या २१.४ टक्के इतकी होती. विशेष म्हणजे राज्य सरकार ज्या नावाचा विचार करत आहे त्या नावाला सर्वात कमी पसंती वाचकांनी दिल्याचं पहायला मिळत आहे.

नक्की वाचा >> नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद : राज ठाकरे म्हणतात, “स्वत: बाळासाहेब असते तर त्यांनी…”

एकूण ४ हजार २६६ जणांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं असं मत नोंदवणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक म्हणजेच एक हजार ८३९ इतकी होती. त्या खालोखाल एक हजार ५८ जणांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला पसंती दिली. सर्वाधिक पसंती मिळालेल्या नावांमध्ये जे. आर. डी. टाटा यांचं नाव तिसऱ्या स्थानी आहे. या पर्यायासाठी ९१३ मतं मिळाली. तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव या विमानतळाला देण्यात यावं असं मत ४५६ जणांनी नोंदवलं.

इन्स्ताग्रामवरही एक हजार ९०० हून अधिक वाचकांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Loksatta (@loksattalive)

फेसबुकवरही या पोलसंदर्भातील फोटोवर तब्बल १२ हजार वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नक्की पाहा >> Photos : एवढं मोठं सप्राइज… ५३ व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंना पुणेकरांकडून खास भेट

फेसबुकवरही या प्रश्नावर मोठ्याप्रमाणात मतमतांतरं दिसून आली. तरी ट्विटरप्रमाणेच येथेही अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला पसंती दिल्याचं चित्र पहायला मिळालं. एकंदरितच या जनमत चाचणीमध्ये सर्वाधिक लोकांनी राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य असल्याच्या बाजूने कौल दिल्याचं दिसत आहे.