News Flash

…म्हणून आज असतो सर्वात मोठा दिवस

आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते

२१ जून सर्वात मोठा दिवस

हे शिर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल मोठा दिवस म्हणजे नेमके काय? तर आज वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आता असे असण्यामागे नेमके कारण काय असेल? तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे हा दिवस मोठा असतो. २१ जून म्हणजेच आजच्या दिवशी हा कालावधी १३ तास १३ मिनिटांचा असतो. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.

२१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो. काही देशांत २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 12:27 pm

Web Title: longest day on earth 21st june know the reason and exact scientific information
Next Stories
1 चार दिवसानंतर पेट्रोलच्या दरात ८ ते १२ पैशांची कपात
2 अभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
3 ‘कुमकुम’ फेम जुही-सचिन अखेर या दिवशी विभक्त होणार!
Just Now!
X