24 January 2021

News Flash

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये ‘बाप्पा’ला आहे विशेष स्थान, फोटो व्हायरल

दिल्लीवर मात करत मुंबई अंतिम फेरीत

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी मात करत गतविजेत्यांनी अंतिम फेरी गाठली. हंगामाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा खेळ हा वाखणण्याजोगा झाला आहे. याच कारणामुळे आतापर्यंत झालेल्या सामन्यांत मुंबईने आपल्या संघात फारसे बदल केले नाहीत. निता अंबानी यांच्या मालकीचा असलेला हा संघ मैदानावर आपल्या लढाऊ बाण्यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत अनेकदा रंगतदार सामन्यांत संघाच्या मालक निता अंबानी व त्यांच्या परिवारातील सदस्य देवाचा धावा करताना आपण पाहिलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मी निकालाची फारशी चिंता करत नाही – जसप्रीत बुमराह

फक्त मालकच नाही तर मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्येही देवाला खास स्थान आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबईच्या डगआऊटमधला एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात सपोर्ट स्टाफच्या टेबलवर गणपती बाप्पाची एक छोटीशी फ्रेम व देवीचा एक फोटो ठेवला आहे. सोशल मीडियावरही हा फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबईकडून फलंदाजीत क्विंटन डी-कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पांड्या तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी चमक दाखवली. बंगळुरु विरुद्ध हैदराबाद या सामन्यातील विजेता संघ दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात दिल्लीसोबत खेळणार आहे. यानंतर या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत मुंबईसोबत दोन हात करेल.

अवश्य पाहा – Video : चिंता करु नको भावा, आम्ही आहोत ! खराब दिवस गेलेल्या राहुल चहरला रोहितने दिला धीर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 7:32 pm

Web Title: lord ganesh picture in mi dugout picture goes viral psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : ‘विराट’सेनेचं पॅकअप, रंगतदार सामन्यात हैदराबाद ६ गडी राखून विजयी
2 ४-१-१४-४…दिल्लीविरुद्ध बुमराहचा भेदक मारा, संजय मांजरेकर म्हणतात सामनावीर फलंदाज हवा होता
3 Video : चिंता करु नको भावा, आम्ही आहोत ! खराब दिवस गेलेल्या राहुल चहरला रोहितने दिला धीर
Just Now!
X