प्रेमातून किंवा एकतर्फी प्रेमातून नकार मिळाला की तरुण-तरूणी सैरभैर होतात, आता ‘सगळं काही संपलं’ असं समजून नैराश्याच्या गर्तेत जातात, पेटून उठतात आणि समोरच्या व्यक्तीला त्रास देतात. समोरील व्यक्ती आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यास मनात विचारांचं काहूर माजतं आणि त्यामध्ये विचित्र गोष्टी घडतात. अमेरिकेतील असाच एक प्रकार समोर आला आहे. एरिजोना येथे राहणाऱ्या एका महिलेने प्रपोजल नाकारले म्हणून चक्क दीड लाख मेसेज पाठवले. यामध्ये धमक्याचे मेसेज होते. त्या महिलेचे नाव जॅकलीन एडेस असे आहे. एका व्यक्तीने प्रपोजल नाकारल्यामुळे नैराशातून तिने चक्क एक लाख ५९ हजार मेसेज पाठवले.

मेट्रो यूकेच्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय जॅकलीनला मानसिक त्रासाच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. जॅकलीन त्या व्यक्तीच्या घरी अनेकवेळा गेली आहे. तिने त्या व्यक्तीच्या घरातील सामानाचाही वापर केला आहे. मे २०१८ मध्येही यामुळेच जॅकलीनला अटक केली होती. त्यावेळी तिच्या कारमधून पोलिसांनी चाकू जप्त केला होता. रिपोर्टनुसार, सुरूवातीला असे म्हटले जात होते की, जॅकलीनने ६५ हजार मेसेज पाठवले होते. पण द एरिजोना रिपब्लिकच्या रिपोर्टनुसार, पाठवलेल्या मेसेजची संख्या एक लाख ५९ हजार होती. यामध्ये विनंती, धमकी आणि प्रेमासह अनेक प्रकारचे मेसेजचा समावेश आहे.

‘इथं येण्यासाठी तू काहीही कर पण मला सोडण्याचा प्रयत्न करू नकोस, जर तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केल्यास मी तूला मारून टाकेल.’ असे एका मेसेजमध्ये लिहले आहे. दुसऱ्या एका मेसेजमध्ये मी तुझ्या हाताची चॉपस्टिक तयार करेल असे म्हटले आहे. एका डेटिंग वेबसाइटवरून भेटल्यानंतर आणि डेटवर गेल्यानंतर महिलेने त्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरूवात केली.