X

सॉरी आजी! यापुढं पदार्थ प्रेमानं तयार करून विकता येणार नाहीत…

बेकरीला FDAने पाठवली नोटीस

आई किंवा आजीच्या हातच्या पदार्थांची चवच काही औरच असते. त्या पदार्थाची रेसिपी आपल्याला माहिती असली आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला काही तो पदार्थ त्याच चवीने तयार करता येत नाही. तो पदार्थ तयार करताना आईनं काय जादू केली किंवा त्यामागचं गुपित काय? असा प्रश्न राहून राहून आपल्या मनात येतो. आई आणि आजीला जर आपण यामागचं गुपित विचारलं तर त्या सहज म्हणतील ‘अगं फार काही नाही पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने पदार्थ केला की तो चांगलाच होतो.’त्यामुळे थोडक्यात काय तर कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी साहित्य, पाककृतीसोबतच थोडं प्रेमही गरजेचं आहे, त्यामुळे हल्ली नाही का अनेक मोठे ब्रँड ‘made with love’, ‘love is our secret ingredient’ अशी जाहिरातबाजी करताना दिसतात.

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी मिशेल यांचा बराक ओबामांना हृदयस्पर्शी संदेश

पण अशीच जाहितबाजी करणं मॅसेच्युसेटमधील बेकरीला त्रासदायक ठरलं. मॅसेच्युसेटमधील नॅशोबा ब्रुक बेकरीला अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पत्र पाठवलं आहे. ग्रॅनोला या न्याहारीत खाण्यात येणाऱ्या पदार्थांच्या साहित्यकृतीमध्ये त्यांनी ‘प्रेम’ हा शब्द वापरला होता. ओट्स, मेवा इत्यादी पदार्थांसोबतच यात थोडसं प्रेमही आहे, असं ब्रुक बेकरीनं म्हटलं होतं. पण अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नेमकं ‘प्रेम’ शब्दावर आक्षेप घेतला. ‘प्रेम’ हा काही पदार्थ नाही किंवा कोणत्याही पदार्थांचं नाव प्रेम असूच शकत नाही असं म्हणत साहित्याच्या यादीतून हा शब्द वगळण्याची सूचना त्यांनी पत्रातून बेकरीला दिली.

एफडीएच्या या आक्षेपावर नॅशोबा ब्रुक बेकरीचे कार्यकारी अधिकारी जॉन गेट्स यांनी नाराजी व्यक्त केली. जर स्वच्छतेविषयी काही सूचना एफडीएने सुचवल्या तर त्या स्वागतार्ह आहेत. पण अशाप्रकारचे बदल सुचवणं हे मूर्खपणाचे आहे, असं सांगत त्यांनी आपली नाराजी एका मुलाखतीत व्यक्त केली. सध्याच्या घडीला १२० दुकांनांत या बेकरीचे पदार्थ विकले जातात.

Viral : यांचा काही नेम नाही!; जिवंतपणीच मित्राच्या शोकसभेचं आयोजन

First Published on: October 5, 2017 11:30 am
Outbrain