25 September 2020

News Flash

मालकाचा मृत्यू; 15 मिनिटांत सोडले पाळीव श्वानानंही प्राण

स्टुअर्ट याला गेल्या आठ वर्षांपासून कर्करोगानं ग्रासलं होतं.

श्वान हा प्रामाणिक प्राणी असल्याचं मानलं जातं. जर त्यांचा आपल्याला लळा लागला तर तो सुटणंही क ठिण आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. स्टुअर्ट हचिसन याने तीन आपल्यासोबत तीन श्वान पाळले होते. परंतु त्यांच्यातील नीरो नावाच्या श्वानाशी त्याचं एक वेगळंच नातं होतं. काही दिवसांपूर्वीच कर्करोगानं स्टुअर्टचं निधन झालं. आपल्या मालकाचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये नीरोनेही आपले प्राण सोडले. यावरून नीरोचं आपल्या मालकावर किती प्रेम होतं हे दिसून येतंय.

स्टुअर्ट याला गेल्या आठ वर्षांपासून कर्करोगानं ग्रासलं होतं. सर्जरी आणि किमोथेरेपी केल्यानंतरही या आजारातून त्याची सुटका झाली नाही. अखेर 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी त्यानं जगाचा निरोप घेतला. यानंतर ठिक पंधरा मिनिटांनी नीरोनंही या जगाचा निरोप घेतल्याचं स्टुअर्टच्या आईनं सांगितलं.

2017 मध्ये स्टुअर्ट आणि डॅनिअल यांचा साखरपुडा झाला होता. अखेरच्या दिवसात स्टुअर्ट हा आपल्या आईसोबत स्कॉटलंडमध्ये राहत होता. ज्यावेळी स्टुअर्टच्या आजाराबद्दल नीरोला समजलं त्यानंतर तोदेखील आजारी राहू लागला. त्यानंतर नीरोवरही उपचार करण्यात आले. परंतु स्टुअर्टच्या निधनानंतर त्यानंदेखील जगाचा निरोप घेतला, असं स्टुअर्टच्या वडिलांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:56 pm

Web Title: loyal dog dies after 15 minutes after owner lost his life scotland jud 87
Next Stories
1 VIDEO: जेव्हा संसदेच्या सभागृहात सभापतीच गे दांपत्याच्या बाळाला दूध पाजू लागतात
2 समुद्रकिनाऱ्यावरील वाळू चोरणाऱ्या दांपत्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
3 इंटरनेट प्लॅन लगेच संपतोय? मोबाइल डेटाची बचत करण्यासाठी ‘हे’ कराच
Just Now!
X