News Flash

VIDEO : मृत आईला बिलगून दूध पीत होता चिमुकला, दृश्य बघून पोलिसांनाही अश्रू अनावर

पोलिसांना रेल्वे रुळावर एक महिलेचा मृतदेह आढळला

मध्य प्रदेशमधल्या एक रेल्वे रुळावर अत्यंत हृद्यद्रावक दृश्य पाहायला मिळालं. आपल्या मृत आईला बिलगून एक चिमुकला दूध पीत होता. आपली आई हे जग सोडून केव्हाच निघून गेलीये हे त्या चिमुकल्याला ठाऊकही नव्हतं. हे दृश्य पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघालं असतं. बुधवारी मध्य प्रदेश पोलिसांना रेल्वे रुळावर एक महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी जेव्हा पोलीस त्याठिकाणी पोहोचले तेव्हा समोर असेललं दृश्य पाहून त्यांच्याही काळजात चर्रर झालं. भूकेने व्याकुळ झालेलं एवढंस पोर आपल्या मृत आईला बिलगून तिचे दूध पित होता. हे दृश्य पाहून पोलिसांनाही आपले अश्रू अनावर झाले.

वाचा : ४८ तास सहजीवनाचे!

वाचा : राँग नंबरमुळे जुळल्या रेशीमगाठी!

या महिलेची ओळख पोलिसांना पटू शकली नाही. पण पोलिसांच्या माहितीनुसार ट्रेनमधून पडून या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. यात मुलं मात्र जिंवत राहिलं. बराच वेळ त्यांच्या मदतीला कोणी आलं नाही. पोलिसांनी काळजावर दगड ठेवून आईला बिलगून रडणाऱ्या या चिमुकल्याला वेगळं केलं. या मुलाला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून, पोलीस आता या महिलेच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 11:19 am

Web Title: madhya pradesh child found breastfeeding on dead mother on railway track
Next Stories
1 सामोसा विक्रेत्याचा मुलगा EAMCET परीक्षेत टॉपर
2 Viral : पैशांपेक्षाही पुण्य कमावण्यात धन्यता!
3 Viral Video : गजराजांच्या क्रीडाप्रेमामुळे रस्त्यावर अर्धातास ट्रॅफिक जाम!
Just Now!
X