News Flash

Viral Video : बुलडाण्यात बाटलीत पेट्रोल दिलं नाही म्हणून संतप्त तरुणाने ऑफिसमध्ये सोडले चक्क तीन साप

दोन कोब्रा तर एक धामण जातीचा साप...

(व्हायरल व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

बाटलीत पेट्रोल दिलं नाही म्हणून पेट्रोल पंपाच्या कार्यालयात चक्क तीन साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात ही घटना घडली असून सीसीटीव्हीमध्ये दृष्य कैद झाली आहेत.

पेट्रोल पंपाच्या कार्यालयात येऊन एक व्यक्ती एका प्लॅस्टिकच्या बरणीतून साप काढून कार्यालयात सोडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. ही धक्कादायक घटना बुलडाण्याच्या मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर सायंकाळी चार वाजता घडल्याची माहिती आहे. बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे हा तरुण चिडला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

बाटलीत पेट्रोलसाठी नकार मिळाल्यानंतर हा तरुण बाइक घेऊन पुन्हा पेट्रोल पंपावर आला आणि पंपावरच्या तीन कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बरणीत आणलेले तीन साप सोडले. यातील दोन कोब्रा तर एक धामण जातीचा साप होता. या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील कर्माचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.


नंतर एका सर्पमित्राला बोलावून सर्व साप पकडण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पेट्रोल पंपचालकाने पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:44 pm

Web Title: maharashtra buldhana angry man throws snake in petrol pump owners cabin sas 89
Next Stories
1 आलप्स पर्वतांमध्ये सापडली १९६६ ची भारतीय वृत्तपत्रं; मुखपृष्ठावर आहे इंदिरा गांधींबद्दलची बातमी
2 चक्क माणसासारखे ओठ आणि दात, कोणता आहे हा अनोखा मासा? तुफान व्हायरल होतोय फोटो
3 खरंच अमिताभ बच्चन आणि नानावटी रुग्णालयाचे आर्थिक हितसंबंध आहेत का?
Just Now!
X