महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर खात्याने हैदराबादमधील एका आयटी इंजिनियरला अटक केली आहे. या इंजिनियरने ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड कंटेंट उपलब्ध करुन देणारे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन निर्माण केले आणि त्यामागील सर्व कारभार तो पाहत असल्याचा आरोप आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबरच सॅटेलाइट चॅनेल्सवरील जवळजवळ सर्वच कंटेंट उपलब्ध असणाऱ्या आणि नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या थोप टीव्हीच्या निर्मात्याविरोधात ही कारवाई करण्यात आलीय.

सतीश वेंकटेशवारलू असं या २८ वर्षीय इंजिनियरचं नाव आहे. सतीशला सोमवारी तेलंगणच्या राजधानीमधून अटक करण्यात आली आहे. सतीशला मुंबईमध्ये आणण्यात आलं असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

नक्की वाचा >> समजून घ्या : ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठे, कशी तक्रार करावी?; तक्रार करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीशनेच थोप टीव्ही या अ‍ॅप्लिकेशनची निर्मती केली. दोन वर्षांपूर्वी थोप टीव्हीची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅप्लिकेशनवर लाखो व्ह्यूवर्स आहेत. विशेष म्हणजे पाच हजार जण पैसे भरुन पायरेटेड कंटेट पुरवणाऱ्या या अ‍ॅप्लिकेशनची सेवा वापरतात.

व्हायकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबतच इतर ब्रॉडकास्टींग कंपन्यांनी महाराष्ट्र सायबर सेलकडे या अ‍ॅप्लिकेशनविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. आमची परवानगी न घेता या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही निर्माण केलेला कंटेट टेलिकास्ट केला जात असल्याची तक्रार या निर्मात्यांनी केलेली. युझर्सला सध्या या अ‍ॅपचा सर्व्हर उपलब्ध होत नाहीय.

या अ‍ॅप्लिकेशनचं सबस्क्रीप्शन केवळ ३५ रुपयांपासून उपलब्ध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या अ‍ॅप्लिकेशनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. एकीकडे अनेक लोकप्रिय कंपन्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सबक्रीप्शन फी ही काही शे रुपयांमध्ये असताना दुसरीकडे त्याच प्लॅटफॉर्मवरील डेटा पायरसीच्या माध्यमातून अगदी स्वस्तात उपलब्ध करुन देणाऱ्या या अ‍ॅप्लिकेशनच्या निर्मात्यावर पोलिसांनी कारवाई केलीय.

नक्की वाचा >> पुणे : सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात; नग्न व्हिडीओ बनवला अन् म्हणाला…

या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमुळे आमच्या कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याचा दावा अनेक कंपन्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. त्यामुळेच पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार कलम ४३, ६६ आणि ६६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलन ६३ हे कॉपीराइट कायदा म्हणजेच स्वामित्व हक्क उल्लंघनाविरोधातील कायदा आहे. तसेच भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीच्या कलम ४२० अर्थात फसवणुकीच्या गुन्ह्याखालीही तक्रार दाखल करण्यात आलीय.