करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ देशात लॉकडाउन जाहीर केलं होतं. सध्या अनलॉकच्या माध्यमातून सरकारने काही गोष्टींना परवानगी दिली असली तरीही वाढती रुग्णसंख्या पाहता, सरकारने पुन्हा लॉकडाउन जाहीर केलं आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्याचं काम पोलीस यंत्रणांवर आहे. महाराष्ट्र पोलीस या काळात अनेक माध्यमांतून जनतेला घरात राहून सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याबद्दल जनजागृती करत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महाराष्ट्र पोलीस करोनाविषयी माहिती क्रिएटीव्ह पद्धतीने देत असतात. मराठी नाटकांच्या नावाचा वापर करुन महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटर हँडलवर लॉकडाउनचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन जनतेला केलं आहे…पाहा, काय म्हणतायत महाराष्ट्र पोलीस

आपल्या आवडत्या नाटकात कलाकारांना त्याच भूमिकेत पुन्हा एकदा बघण्यासाठी आधी आपल्याला जबाबदार नागरिकाची भूमिका निभवावी लागेल, असं म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी जनतेला लॉकडाउनचे नियम पाळत पोलीसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.