लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एका शेतामध्ये तब्बल सहा एकरमध्ये शिवाजी महाराज यांची ग्रास पेंटीग तयार करण्यात आले आहे. गुगल अर्थवरून शिवाजी महाराजांची भव्य वृक्षरांगोळी दिसतेय. मंगेश निपाणीकर या पेंटिंगचे निर्मितीकार आहेत. गेल्या वर्षी अरविंद पाटील निलंगेकर यांनी लातूरमध्ये रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती.

यंदा १९ फेब्रुवारी शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे जवळपास सहा एकरात गवताच्या बियाची रोपण करून हरीत शिवप्रतिमा साकारण्यात आली होती. आता चार महिन्यांनंतर याच हरित शिवप्रतिमेचा गुगल मॅपवरून एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. हा मॅप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नेटीझन्स गुगल मॅपचा एका व्हिडीओ शेअर करत आहेत. यात ते एक लोकेशन शेअर करत आहेत. गुगल मॅप आपलं काम करतो आणि शिवाजी महाराजांचं एक सुंदर चित्र दिसू लागतं.

This is an incredible Chhatrapati Shivaji Maharaj crop art from the Farmers of small village in Nilanga, Latur, Maharashtra. (WA) pic.twitter.com/QG3sSJqed0

4QP5+8Q Dapka, Maharashtra, Maharaj Farm Painting किंवा Balaji Mandir, Nilangaand गुगल मॅपवर सर्च केल्यानंतर महाराजांची सुंदर ग्रास पेंटींग दिसून येते.