सध्या ट्विटर ही अशी जागा आहे जिथे लोकं कोणत्याही मुद्द्यावरुन वाद घालू शकतात. असाच एक वाद नुकताच ट्विटवर रंगला आणि तो ही थेट महाराष्ट्राशी आणि मराठी अस्मितेशी संबंधित. हा वाद होता मराठी खाद्यपदार्थ विरुद्ध गुजराती खाद्यापदार्थ. तसा वाद होण्याचं काही विशेष कारण नव्हतं मात्र ट्विटरवर वाद होण्यासाठी विशेष काही लागत नाही. या वादामध्ये अनेकजणांनी सहभाग घेतला. म्हणजे मराठी आणि गुजराती व्यक्तींबरोबरच इतर प्रदेशातील व्यक्तींनीही या चर्चेत सहभाग नोंदवला. बरं हा वाद सुरु कशावरुन झाला हे ही सांगता येणार पण वादा झाला हे मात्र नक्की. आता ट्विटवरील काही मराठी नेटकऱ्यांच म्हणणं होतं की महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ जगात भारी आहेत. तर गुजरातमधील नेटकऱ्यांनी हा दावा खमणी आणि ढोकळ्याचा संदर्भ देत खोडून काढला. झालं ही ठीणगी पुरेशी होती. यावरुनच ट्विटरवर #FoodWars हॅशटॅगखाली सुरु झाला खाद्यसंस्कृतीवरुन रंगलेला राडा.

नक्की वाचा >> “लिफ्टची क्षमता ३५० किलोची असताना तो दीड टनचा एसी घेऊन गेला”; महिलेची तक्रार व्हायरल

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Udayanraje Bhosale, sharad pawar
“माझ्या बारशाचं जेवण…”, शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या कृतीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम

पुरण पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर आणि वरण भात असणाऱ्या ताटाचा फोटो मल्हार पांडे नावाच्या व्यक्तीने शेअर केला. यावर हे सर्वोत्तम आहे यात आम्हालाही शंका नाही, असं अनेकजण म्हणाले.

त्यावर दुसऱ्या एका मुलीने महाराष्ट्रातील वडापाव, पावभाजी आणि काही खाद्यपदार्थांचे फोटो पोस्ट करत महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ म्हणजे प्रेमच आहे, असं म्हटलं

तिसऱ्याने तर्री पोहेसुद्धा इतर कोणत्याही पदार्थाला चांगली टक्कर देऊ शकतात असं सांगत महाराष्ट्रातील खाद्यपादर्थांचे कौतुक केलं.

आता यावरुन गुजराती खाद्यपादर्थांच्या चाहत्यांनाही आपली मत मांडण्यास सुरुवात केली.एकाने खमणीचा फोटो पोस्ट करत हा एक पदार्थ सर्व महाराष्ट्रीयन पदार्थांवर भारी असल्याचं म्हटलं.

त्यावर दुसऱ्याने हा पदार्थ तुम्ही आमच्याकडून चोरला असून आम्ही याला सुरळीच्या वड्या असं म्हणतात, असं ट्विट केलं.

बरं या दोन्हीकडील वादात इतर प्रदेशातील लोकांनी उडी घेतली नाही तर ते भारतीय कसले नाही का? या वादामध्ये भारतातील इतर राज्यांमधील लोकं मजा घेत असतानाच मध्येच आमच्याकडील खाद्यपदार्थही काही कमी नाहीत असं मिम्सच्या माध्यमातून अधोरेखित करत होते.

बाकी सारं राहू द्या छोले भटुरे बेस्ट आहेत असं एकजण म्हणाला.

बरं एवढा सगळा खाद्यपदार्थांचा मारा होत असताना महाराष्ट्रातील नेटकरी थोडी शांत बसणार होते. त्यांनाही थेट नाद करा पण आमचा कुठं म्हणत पावसाळ्यात वडा आणि मिसळपेक्षा बेस्ट काही असूच शकत नाही हे ठासून सांगितलं.

एकीकडे महाराष्ट्रीयन नेटकरी कमबॅक करत असताना दुसरीकडे नेटकरी गुजरात्यांवर संतपाले. एकाने दक्षिणात्य खाद्यपदार्थ हे गुजराती खाद्यपदार्थांपेक्षा चांगले असल्याचं म्हटले.

या दाक्षिणात्यविरुद्ध गुजरात फूड वॉरमध्ये दुसऱ्याने उडी घेत गुजराती लोकं सर्व खाद्यपदार्थांमध्ये साखर घालतात असं म्हटलं.तर इतर राज्यांमधील लोकं या वादाचाच आस्वाद घेत असल्याचे मिम्स अनेकांनी शेअर केले.

इतक्यात एका महिलेने गुजराती आणि मराठी लोकं कोणाचे खाद्यपदार्थ चांगले आहेत यावरुन भांडत असले तरी हॉटेलमध्ये जाऊन दाक्षिणात्य पदार्थचं खातात असा टोला लगावला.

एकाने गुजराती की मराठी या वादात न पडता दोन्ही खाद्यसंस्कृतीमध्ये वडापाव, मिसळ, ढोकळा आणि फाफड्यापेक्षा बरंच काही आहे याची आठवण करुन दिली.

या वादात अनेकजण आपली मत मांडताना त्या त्या प्रदेशातील खाद्यपदार्थांच्या थाळ्यांचे फोटो पोस्ट करत होते.

एकाने तर वडापाव फ्लेवरच्या खाकऱ्याचा फोटो पोस्ट करत वर वर भांडता पण तुमची आतून युती आहे असा मजेदार टोला लगावला.

काहींनी सगळे पदार्थ चांगले असल्याचं सांगत आपण एकत्र राहत सर्वच खाद्यपदार्थांचा आनंद घेतला पाहिजे असं मत व्यक्त केलं.

काहींनी मिम्सच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवताना अनेक भारतीयांना महाराष्ट्र आणि गुजरातपेक्षा जेवणाचे दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि इतर सर्व असे तीनच प्रकार ठाऊक असल्याचं म्हटलं.

एकंदरितच या जेवणावरुन सुरु झालेल्या वादाचा काही ठोस निकाल लागला नसला तरी मिम्स आणि चर्चेची भूक नेटकऱ्यांना भागवून घेतली असंच म्हणता येईल.