महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे ट्विटरवर फार अॅक्टिव्ह असतात. तसंच ट्विटरवर त्यांचे अनेक फॉलोअर्सदेखील आहेत. नुकतंच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आणि त्या वेबिनार या शब्दाचा उल्लेख केला. तसंच वेबिनार हा शब्द बॅन करायला हवा असंही त्यांनी म्हटलं.

करोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील अनेक जण वेबिनारद्वारेच घरबसल्या काम करत आहे. परंतु आनंद महिंद्रा यांना हा प्रकार आवडला नसून त्यांनी हा शब्द बॅन करण्याचीच मागणी ट्विट करत केली. त्यावर अभिनेता रितेश देशमुख यानंही एक प्रतिक्रिया दिली जी सर्वच नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली. “मला विचारायचंय की वेबिनार हा शब्द डिक्शनरीमधून काढून टाकण्यासाठी आपण याचिका दाखल करू शकतो का? मी समजू शकतो की हा शब्द आताच आलाय. परंतु हा शब्द डिक्शनरीमधून गायब करता येईल का?,” असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

यानंतर त्यांनी एक ट्विट केल. “माझ्या कुटुंबीयांनी वेबिनारसाठी अनेक शब्दांचा पर्याय सुचवला आहे. जर चेन्नईची कोणी व्यक्ती वेबिनार करत असेल कर ते ‘वेबिनारायण’ असेल. तर एखादे गुरू वेबिनार आयोजित करतील तर ते ‘स्वामीनार’ असेल. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे,” असं ते म्हणाले. आरपीजी एन्टरप्राईझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनीदेखील त्यांच्या या ट्विटला रिप्लाय दिला. “जी व्यक्ती वेबिनारमध्ये भाग घेत नाही त्यांना चतुर नार म्हटलं जातं.” त्यांच्या या ट्विटला भरपूर लाइक्स मिळाले. यावर रितेश देशमुख यानंही रिप्लाय दिला. “जी व्यक्ती वेबिनारमध्ये भाग घेत नाही त्याला वेबवाह म्हटलं जातं,” असं तो म्हणाला. परंतु त्याच्या म्हणण्याचा अर्थ बेवफाह असा होता.