महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडिवर फार अॅक्टिव्ह असतात. अनेकदा सामान्यांच्या मेसेजनाही रिट्विट करताना ते दिसतात. सोमवारी आनंद महिंद्रा यांनी ज्येष्ठ गीतकार गुलझार यांच्या कवितेच्या ओळी असल्याचं सांगत एक ट्विट केलं. परंतु नेटकऱ्यांनी या ट्विटमधील महिंद्रा यांची चूक पकडली. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये हाती सतत मोबाईल घेणाऱ्यांबाबत वक्तव्य केलं होतं.

थॅक्यू गुलझारजी. ज्यांनी मला आपल्या फोनला चिकटून राहण्यासाठी आवश्यक असलेलं लॉजिक दिलं. परंतु मोबाईल आपल्याला दुसऱ्याशी कनेक्ट राहण्यासाठीही मदत करतो हे एक सत्य आहे, अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये संगीतकार गुलझार यांच्या फोटोसोबत एका कवितेच्याही काही ओळी लिहिण्यात आल्या आहेत. ‘खुद से ज़्यादा संभाल कर रखता हूं मोबाइल अपना, क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं,’ असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.