29 October 2020

News Flash

आनंद महिंद्रा रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गुंतवणूक करणार?

बोलेरो गाडीत या महिलेने फुड सेंटर उभारले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यांनी मध्यंतरी आयुष्य सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे जगावे, हे सांगण्यासाठी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आनंद महिंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्विटरवरील काही युजर्सनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. मंगलोरमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या महिलेचा हा व्हिडिओ आहे. महिंद्राच्या बोलेरो गाडीत या महिलेने फुड सेंटर उभारले आहे. या अनोख्या फूड सेंटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता. ट्विटरवरील काही युजर्सनी ही गोष्ट आनंद महिंद्रा यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पाहिला व ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी थेट या महिलेला व्यवसायात मदत करण्याची तयारी दाखवली. तिला मदतीची गरज नसली तरी आपण तिच्या व्यवसायात गुंतणवूक करू. जेणेकरून व्यवसाय वाढायला मदत होईल. साहजिकच आनंद महिंद्रांचा हा प्रस्ताव महिलेसाठी स्वप्नवत होता. तर दुसरीकडे अनेक युजर्सनी आनंद महिंद्रा यांनी दाखवलेल्या मोठेपणाचे कौतुक केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मंगलोरमधील शिल्पा यांचा आहे. त्यांनी महिंद्राच्या बोलेरो गाडीचे रुपांतर फूड सेंटरमध्ये केले आहे. याठिकाणी त्या कानडी पद्धतीचे खाद्यपदार्थ विकतात. उत्तम चवीमुळे त्यांचे हे फूड सेंटर चांगलेच लोकप्रिय झाले आहे. येथील काही ग्राहकांनी या फूड सेंटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 4:06 pm

Web Title: mahindra ceo wants to invest in a womans food truck business that she runs from inside a bolero
Next Stories
1 …म्हणून पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची आमदाराची मागणी
2 …आणि तिने पायाने काढले सर्वात मोठे चित्र
3 नववर्षाच्या मुहूर्तावरच व्हॉट्स अॅप बंद, नेटिझन्स मेटाकुटीला
Just Now!
X