कुठे गुलाबी, तर कुठे लाल तर कुठे पिवळी, कुठे मोदींचे चित्र असलेला पतंग तर कुठे विविध पक्षांची चिन्ह असलेल्या पतंगांनी आकाश पुढचे दोन दिवस भरून जाईल. कुठे शेजा-यांची पतंग गुल करण्याची स्पर्धा तर कुठे आपली पतंग उंचच उंच नेण्याची स्पर्धा अशी पतंगाची स्पर्धाच जणू मकरसंक्रांतीला पाहायला मिळते. त्यातून गुजरातमध्ये तर अनेक ठिकाणी खास पतंगोत्सव भरतात, नाना आकाराचे विविध रंगांचे शेकडो पतंग आकाशात उडवले जातात. हा पतंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. पण तुम्हाला माहितीय मकरसंक्रांतीलाच पतंग का उडवला जातो?

Makar sankrant: जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर

खरे तर आपल्या प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्व असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. ही कारणे समजून घेतली तर आपली संस्कृती किती प्रगत आहे याचा आपल्यालाच अभिमान वाटेल. आता पतंग उडवण्याचे घ्या ना! तसं बघायला गेले तर तुमच्या आमच्यासाठी हा साधा खेळ. कागदाचा पतंग आणि मांजा बाजारातून आणायचा. शेजा-या पाजा-यांचे पतंग गुल करायचे आणि मज्जा लुटायची बस्स. पण पतंग उडवण्यामागे एक कारणही आहे. खरतर संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. ऊनही फार कमी मिळते आणि आपसूकच थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात आणि ती मिळावीत यासाठी हा खेळ खेळला जातो. यानिमित्ताने का होईना पतंग उडवण्यासाठी थंडीतून लोक घराबाहेर पडतात छतावर येतात. त्यामुळे पुरेपुर ऊन शरीराला मिळते.

तिळगुळ घ्या गोडगोड बोला… आपल्या प्रियजनांना द्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

पण पतंग उडवण्याचा हा खेळ फक्त भारतातच असतो असे नाही बरं का! फार पूर्वी अफगाणिस्तानमध्येही हा खेळ खेळला जायचा. पण सध्या तालिबानने या खेळावर पूर्णपणे बंदी घातली आहे. पाकिस्तान आण चिनमध्येही पतंग उडवले जायचे. चिनमध्ये खास बांबूपासून आणि रेशमाच्या कपड्यापासून बनवलेले पतंग उडवले जात असल्यचे अनेक संदर्भ सापडतील.