News Flash

Makar Sankranti 2017: दरवर्षी १४ जानेवारीलाच मकर संक्रांत का साजरी केली जाते?

२०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल

सौर दिनदर्शिकेनुसार हा सण नेहमी याच तारखेला येतो.

मकर संक्रांत हा असा एकमेव हिंदू सण आहे जो दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. २०१५ मध्ये अपवाद वगळता गेल्या कित्येक  वर्षांपासून हा सण १४ जानेवारीलाच साजरा केला जात आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते. भारतीयांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा आहे. नवीन वर्षांतील हा पहिला सण असतो. देशातील अनेक भागात पीक कापणीला येते. दिवस मोठा होतो आणि याच आनंदात मकर संक्रांत साजरी करण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला माहितीय दरवर्षी हा सण १४ जानेवारीलाच का साजरा केला जातो?

Makar Sankranti 2017: तुम्हाला मकर संक्रांतीविषयी ‘या’ गोष्टी ठावूक आहेत का?

Makar Sankranti 2017: जाणून घ्या मकर संक्रांतीचे महत्त्व

हिंदू धर्मियांचे अनेक सण आहेत. हे सण दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या तारखेला येतात. पण संक्रांत मात्र दरवर्षी १४ जानेवारीलाच येते. याचे कारण असे आहे सौर दिनदर्शिकेनुसार हा सण नेहमी याच तारखेला येतो. तर इतरवेळी आपण चंद्र दिनदर्शिका किंवा हिंदू दिनदर्शिका प्रमाण मानत असतो. सौर दिनदर्शिकेनुसार याची तारिख ही ठरलेली असते. विशेष म्हणजे चंद्रदिनदर्शिकेत ३५४ दिवस असतात तर उरलेल्या ११ दिवसांचा अधिक मास असतो. तर सौर दिनदर्शिका ही ३६५ दिवसांची असते. म्हणूनच सौर दिनदर्शिकेप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून संक्रांत ही नेहमी १४ जानेवारीला येते. पण यापुढे संक्रांत १४ जानेवारीला येईल असे नाही.

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तारिख पुढे सरकत जाणार आहे. याचे कारणही त्यांनी सांगितले. आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते, तेथे सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असते. सूर्य २१ डिसेंबर रोजी सायन मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिनमान वाढत जाते . परंतु आपली पंचांगे ही निरयन असल्यामुळे सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत असते. मकर संक्रांत नेहमी १४ जानेवारीला येते असे नाही. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबर रोजी आली होती. सन १८९९ पर्यंत मकर संक्रांती १३ जानेवारीला येत होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीला येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल असेही पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Makar Sankranti 2017: म्हणून मकर संक्रांतीला पतंग उडवला जातो

Makar sankrant: जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व

तिळगुळ घ्या गोडगोड बोला… आपल्या प्रियजनांना द्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 6:13 pm

Web Title: makar sankranti 2017 why do we celebrate makar sankranti on january 14 every year in india
Next Stories
1 Makar Sankranti 2017: जाणून घ्या मकर संक्रांतीचे महत्त्व
2 Makar Sankranti 2017: तुम्हाला मकर संक्रांतीविषयी ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?
3 Makar Sankranti 2017: म्हणून मकर संक्रांतीला पतंग उडवला जातो
Just Now!
X