News Flash

Yabba dabba doo! गर्भश्रीमंत सुलतानाला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली ‘फ्लिंटस्टोन कार’

'फ्लिंटस्टोन' कार्टुन सुलतानला खूप आवडायचं

सुलतानची 'फ्लिंटस्टोन कार '

‘फ्लिंटस्टोन’ हे कार्टुन अनेकांना आठवत असेल. अश्मयुगीन काळातील माणूस फ्रेड फ्लिंटस्टोनचं कुटुंब आणि त्याच्या मित्रपरिवारावर आधारित ही कार्टुन मालिका खरं तर १९६०-६६ च्या काळात अमेरिकन घराघरात गाजली. नव्वदच्या दशकात ही मालिका कार्टुन नेटवर्कमुळे जगभरात पसरली. बघता बघता फ्रेड आणि त्याचं कुटुंब लहान मुलांचं आवडत कार्टुन कॅरेक्टर बनलं. या कार्टुन कॅरेक्टरचा चाहता मलेशियाचा गर्भश्रीमंत सुलतानदेखील होता. नुकतीच सुलतानच्या मित्रपरिवारानं या कार्टुन मालिकेतील फ्रेड फ्लिंटस्टोनच्या प्रसिद्ध कारची प्रतिकृती त्यांना भेट म्हणून देली आहे.

Viral Video : अमेरिकन सिनेटरचा ‘अदृश्य चष्मा’ होतोय व्हायरल

धक्कादायक – जलिकट्टूच्या विजेत्याला बैलाची मालकीण मिळणार बक्षीस

इब्राहम असं या सुलतानचं नाव असून ते मलेशियामधले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा वाढदिवस झाला. यानिमित्तानं त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांच्यासाठी खास ‘फ्लिंटस्टोन कार’ तयार करून घेतली. लाकूड, दगड आणि कपड्यापासून तयार केलेली सुलतान इब्राहमही नवी कोरी कार खरोखर फ्लिंटस्टोनच्या कारसारखीच दिसत होती. सुलतान इब्राहमला महागड्या कारची खूपच आवड आहे. त्याच्या घरातदेखील अनेक अलिशान गाड्या आहेत. सुलतान इब्राहम यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या गाडीची माहिती दिली. Yabba dabba doo! हे फ्रेड फ्लिंटस्टोनच्या तोंडी असलेलं प्रसिद्ध वाक्य लिहित त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 5:58 pm

Web Title: malaysias most powerful and wealthiest sultan ibrahim receives flintstones car
Next Stories
1 धक्कादायक – जलिकट्टूच्या विजेत्याला बैलाची मालकीण मिळणार बक्षीस
2 Viral Video : अमेरिकन सिनेटरचा ‘अदृश्य चष्मा’ होतोय व्हायरल
3 ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणी त्याने स्वत:चीच केली पोलिसांत तक्रार
Just Now!
X