तृणमूल काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ‘वंदे मातरम्’ गाण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदी घातल्यावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंगालच्या विधान भवनात तोडफोड केल्याची ध्वनिचित्रफित बनावट आहे. प्रत्यक्षात ही घटना २००६ मधील आहे. सिंगुर येथील टाटाच्या ‘नॅनो’ प्रकल्पस्थळी जाण्यास ममता यांना पोलिसांनी अटकाव केला होता. याविरोधात तृणमूलच्या संतप्त कार्यकर्त्यांनी विधानभवनात गोंधळ घातला. या वेळी कार्यकर्त्यांनी खुच्र्या फेकल्या होत्या. याशिवाय येथील लाकडी सामानाची मोडतोड केली होती. मध्यंतरी ममता यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणू न दिल्यावरून मोडतोड केल्याबद्दलचा दिशाभूल करणारा ‘व्हिडीओ’ प्रसारित करण्यात आला होता.